Download App

मोदींच्या कुटुंबात ते आणि फक्त त्यांची खुर्चीच, ‘मोदी का परिवार’वरून उद्धव ठाकरेंनी डिवचले

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (Narendra Modi) उल्लेख असलेलं एक गाणं प्रदर्शित केल. मै हू मोदी का परिवार हू, अशा आशयाचं हे गाणं आहे. याच गाण्यावरून आता ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींव जोरदार टीका केली. तुमच्या परिवारात फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची आहे, एवढाच तुमचा परिवार आहे, बाकी परिवार कुठंय?, असा सवाल ठाकरेंनी केला.

‘इंडिया’च्या व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर आले; पण ठाकरे, पवारांसमोरच थेट घराणेशाहीवर बोलले ! 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Dodo Nyaya Yatra) आज मुंबईत समारोप होतोय. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर इंडिया आघाडीची भव्य सभा होत आहे. या सभेला संबोधित करतांना ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. या सभेला संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, महात्मा गांधींनी 1942 मध्ये इंग्रजांना चले जावं सांगितलं होतं. आचा देशात जी हुकूमशाही आहे, ती दिल्लीत लोकशाही मारण्यासाठी टपलेली आहे. या हुकुमशाहीला हद्दपार करण्यासाठी तुम्ही शिवाजी पार्क निवडलं, त्याबद्लद आभार मानतो… खरंतर भाजप हा एक फक्त फुगा आहे. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की, या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीचं केलं होतं. संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते. त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली. आता ते संविधान बदलण्यासाठी चारशे पारचा नारा देतात, ते काय फर्निचरचे दुकान आहे का?, असा सवाल ठाकरेंनी केला.

भाजपकडून 10 वर्षे जनतेची फसवणूक, मोदींची गॅरंटी चालणार नाही; पवारांचे टीकास्त्र 

ठाकरे म्हणाले, मला आठवते जेव्हा आम्ही इंडिया आघाडीची पहिली सभा घेतली, तेव्हा मोदीजी म्हणाले होते की ही विरोधी पक्षांची बैठक आहे. आम्ही जरूर विरोधी आहोत. पण आम्ही हुकूमशाहीविरुध्द आहोत.. मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती आरोप करता, पण तुमच्या परिवारात फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची आहे, एवढाच तुमचा परिवार आहे, बाकी परिवार कुठंय?, असा सवाल ठाकरेंनी केला.

हुकूमशाहीचा अंत करा
भाजपला देशाची घटना बदलण्यासाठी चारशे पारचा नारा दिला. चारशे पार म्हणायला ते काय फर्निचरचे दुकान आहे का? यावेळी मी तर म्हणतो, अबकी बार भाजप तडीपार करून हुकूमशाहीचा अंत करा, असं आवाहन ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केलं.

follow us

वेब स्टोरीज