Download App

एकनाथ शिंदे नाराज? उदय सामंतांनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

  • Written By: Last Updated:

Uday Samant Reaction On Eknath Shinde : दिल्लीत काल महायुतीच्या (Mahayuti) तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर काही मागण्या ठेवल्याचं समोर आलंय. तर या बैठकीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा एक फोटो समोर आला. त्यानंतर शिंदे नाराज असल्याच्या चर्चांणा मोठं उधाण आलं होतं. यावर आता शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले की, सकारात्मक चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, फडणवीस साहेब, अजित दादा यांच्यासोबत चर्चा (Maharashtra Politics) होईल. शिंदे साहेबांसोबत सन्मानपूर्वक चर्चा झाली. मंत्रिमंडळाची चर्चा लवकरच पूर्ण होईल. काल शिंदे साहेब जेव्हा अमित शहा यांना भेटले तेव्हा अतिशय चांगलं वातावरण होतं. आजच्या बैठकीबद्दल बोलताना ते म्हणाले की, केंद्रिय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते याबाबत ठरवतात.

दोन डिसेंबरला होणार शपथविधी, मंत्रिमंडळात ‘या’ 33 चेहऱ्यांना मिळणार संधी…

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, जे केंद्रीय नेतृत्व ठरवेल ते शिंदे साहेबांना माहिती होईलच. जे काही बोलणं झालं, ते सगळचं प्रसार माध्यमांच्या समोर येणार (Eknath Shinde Upset News) नाही. आमची भावना आहे की, शिंदे साहेबांनी मूळ सरकार मध्ये राहावं आणि सगळ्यांना पुढे घेऊन जावं. उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांणा देखील उधाण आलंय, तर या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचं स्वत: उदय सामंत म्हणाले आहेत.

पडळकर-खोत ईव्हीएमच्या समर्थनासाठी मैदानात; ‘मविआ’च्या रणनीतीला प्रत्युत्तर

लाडकी बहीण नवीन नियमावलीबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, नव्याने नियम कुठलेही आलेले नाही. यात बदल होणार नाहीत. सरकार स्थापन करायला काही अडचण नाही. भाजपने स्पष्ट केलंय की, त्यांच्या नेत्याची निवड लवकरच होईल. कुठेही एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते थोडे आजारी आहेत, प्रत्येकाला धावपळीतून अडचणी निर्माण होतात. चांगल्या वातावरणासाठी ते गावी गेले असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत. आमचा फॉर्म्युला कसा असेल, यापेक्षा आपला विरोधी पक्ष नेता होणार आहे का नाही? यावर त्यांनी विचार करावा असा टोला देखील सामंतांनी लगावला आहे.

सकाळी 7 ते 12 पर्यंत मोठ्या प्रमाणावर मतदान होतं. दुपारच्या सत्रात कमी होतं आणि नंतर पुन्हा एकदा संध्याकाळी जास्त होतं. नवीन सिस्टीम कुठलीच नाहीये. 45 हजार रुपये भरावे आणि ईव्हीएम मशीन चेक करावं, असं देखील उदय सामंत म्हणाले आहेत.

 

follow us