पडळकर-खोत ईव्हीएमच्या समर्थनासाठी मैदानात; ‘मविआ’च्या रणनीतीला प्रत्युत्तर

पडळकर-खोत ईव्हीएमच्या समर्थनासाठी मैदानात; ‘मविआ’च्या रणनीतीला प्रत्युत्तर

प्रशांत गोडसे, मुंबई

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल (Maharashtra Election Results 2024) समोर आल्यानंतर विरोधकांनी त्याच खापर ईव्हीएम मशीनवर फोडण्यास सुरुवात केली आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधकांनी त्या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या या रणनीतीला प्रत्युत्तर देण्यासाठी ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यांमध्ये महायुती सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं आहे. मात्र विरोधी पक्षातील एकही पक्ष विरोधी पक्षनेते पदासाठी लागणाऱ्या आमदारांची संख्या गाठू शकला नाही. त्यामुळे विरोधकांनी ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. आगामी काळातील निवडणुकीत ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात या अशा प्रकारची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

“एक दिवसांत ९.९९ लाख मतदान कसं वाढलं?” पटोलेंनी निवडणूक आयोगाला पुन्हा घेरलं

यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे शिवसेना जनआंदोलन उभारणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगितलं जात आहे. या आरोपाविरोधात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत आक्रमक झाले असून त्यांनी आज मंत्रालयासमोरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. नव्या तंत्रज्ञानाच्या सन्मानार्थ सदाभाऊ गोपीचंद मैदानात अशा प्रकारच्या घोषणांनी यावेळी परिसर दणदणून निघाला होता.

ईव्हीएम मशीन विरोधात फेक नरेटिव्ह निर्माण करून राज्यातील जनतेची दिशाभूल महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर देखील टीकास्त्र सोडलं आहे. सत्ताधारी पक्षातीलच आमदार आंदोलन करत असल्याने या आंदोलनाची नागरिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

बॅलट निवडणुकांसाठी सह्यांची मोहीम

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी संविधानदिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केली आहे. महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरु केली जाणार आहे. जनतेच्या सह्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत.

तब्बल 21 जिल्ह्यात काँग्रेसला भोपळा.. नाना पटोलेंसह दोन मतदारसंघात काठावर पास

ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल देताना केलेले विधान राजकीय आहे, असे मत मांडता येते का हा प्रश्न आहे. निकाल देताना कायद्यात काय तरतूद आहे. त्यावर स्पष्टता असायला हवी होती. परंतु न्यायाधीश व न्यायालयाच्या निकालावर जास्त काही बोलणे उचित नाही असेही पटोले काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube