Download App

‘आम्हाला नकली म्हणणारे बेअकली’, उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात

राजकारणात भाजपला पोरचं होत नाहीत, म्हणून त्यांना सगळी नकली संताने देखील आपल्या मांडीवर घ्यावी लागतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Uddhav Thackeray Thane sabha : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendr Modi) उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका केली. मोदींच्या टीकेला आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. राजकारणात भाजपला पोरचं होत नाहीत, म्हणून त्यांना सगळी नकली संताने देखील आपल्या मांडीवर घ्यावी लागतात, असा टोला ठाकरेंनी लगावला.

जेव्हा मी मोठी होत होते, मला…, भूमी पेडणेकरने सांगितला ‘तो’ किस्सा 

नकली म्हणणारे बेअकली….
उद्धव ठाकरेंनी आज ठाण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी बोलतांना ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मोदींना काय झालं तेच कळत नाही. ते मला नकली संतान म्हणतात. माझ्या पक्षाला नकली सेना म्हणतात. जो कुणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल, तो बेकअली आहे. कारण, हिंदु हृदयसम्राटांनी त्यांच्या मर्जीने माझ्यावर शिवसेनेची जबाबदारी सोपवली होती, असं ठाकरे म्हणाले.

भाजपला पोरंचं होतं नाहीत…
शिवसेनेला नकली म्हणाऱ्यांची भाजपा आता नकली झाली आहे. कारण, भाजपमध्ये मुळं भाजपवासी कमी आणि बाहेरचे जास्त झालेत. राजकारणात भाजपला पोरचं होत नाहीत, म्हणून त्यांना सगळी नकली संताने देखील आपल्या मांडीवर घ्यावं लागतं, असा टोला ठाकरेंनी लगावला.

ठाकरे म्हणाले, मोदीजी माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करतात. यांना शिवसेनाप्रमुखांची घराणेशाही नाही चालत. पण गद्दारांची पोरं तुम्ही कडेवर घेऊन फिरता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. गद्दारांच्या पोराला तुम्ही उमेदवारी दिली. जर द्यायची होती तर ज्यांच्यामुळं भाजपची ओळख निर्माण झाली, त्या प्रमोद महाजन यांच्या लेकीला उमेदवारी द्यायची होती, असं ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करतांना ते म्हणाले की, गद्दारांना जे जे देता येण्यासारखं होतं, ते सगळं दिलं. नगरविकास खातंही त्यांना दिलं. पण, त्यांना भस्म्या झाला, दिलेलं सगळं त्यांना कमी पडलं. जेव्हा शिवसेना सांभाळायची होती, तेव्हा गद्दारांनी सेना विकली. गद्दार देशभक्त नाहीत, ते नमो भक्त आहेत. नमो रुग्ण आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली. गद्दारांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरला तरीही त्यांना गाडायला ताकतीने उभा आहे, असा इशारा ठाकरेंनी दिला.

 

follow us

वेब स्टोरीज