Uddhav Thackeray : विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी केला. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही यावर प्रतिक्रिया देत हा भाजपचा नोट जिहाद आहे का?, असा सवाल केला.
विनोद तावडेंना थेट दिल्लीतून घेरलं! कॉंग्रेसचा सवाल, म्हणाले सत्तेचा गैरवापर…
उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाल की, पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हे कोणी पाहिलं पाहिजे? निवडणूक आयोगाने पाहिलं पाहिजे. काल अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर आज पैसे वाटपाचे काही व्हिडिओ समोर आले. त्यामुळं हे जादुचे पैसे कोठून आले? कोणाच्या खिशात जात होते? आताही माझी बॅग तपासली गेली मग त्यांच्या बॅगांची तपासणी कोण करणार, असा सवाल ठाकरेंनी केला.
मतदानाआधी डहाणूत राजकीय उलथापालथ! बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश
ते म्हणाले की, मला असं वाटतं की, निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, अन्यथा निवडणूक आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल, असा इशाराही ठाकरेंनी दिला.
विनोद तावडेंवर गुन्हा दाखल झाला असेल तरी आरोप फरार व्हायला नको. कारण असं काही ठिकाणाहून काल सुद्धा मला माहिती मिळाली. कदाचित त्यांच्यात गॅंगवार असतील. पण काल नाशिकमध्ये ह्यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना फरार झाली, अशी ऐकीव माहिती माझ्याकडे आहे. माझ्याकडे त्याचा पुरावा नाही. निवडणूक आयोगाने नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, असं ठाकरे म्हणाले.
हा नोट जिहाद…
विनोद तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंत सरकार कशी पाडली असतील आणि कशी बनवली असतील याचा हा पुरावा आहे. हा भाजप, शिंदे आणि अजित पवारांचा ‘नोट जिहाद’ आहे का? बाटेंगे और जिंतेंगे असं काही तरी… याचा छडा लागला पाहिजे, असं ठाकरे म्हणाले.