मतदानाआधी डहाणूत राजकीय उलथापालथ! बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश
Bahujan Vikas Aghadi Candidate Suresh Padvi Joins BJP : विधानसभा निवडणुकीचं मतदान (Assembly Elections 2024) काही तासांवर येवून ठेपलंय. अशातच डहाणू विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं समोर आलंय. बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी आहेत. पाडवी यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलाय. सुरेश पाडवी यांनी भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळं आता डहाणू मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत.
Breaking…
हितेंद्र ठाकूर बविआचा उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला….
भाजपच निच राजकारण तेही मतदानाच्या पुर्व संधेला…👇🏻 pic.twitter.com/8oximnzJZk
— गद्दारनाथ शिंदे (@YZ_Andhbhakt) November 19, 2024
बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी (suresh padvi joins bjp) भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर पाडवी यांनी अधिकृतरित्या भाजपात पक्षप्रवेश केलाय. या सर्व घडामोडींमुळे आता डहाणू मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढल्याचं चित्र आहे.
तावडेंना भाजप नेत्यांनीच पकडून दिलं, त्यांच्यावर गृहखात्याकडून पाळत; संजय राऊतांचा गंभीर आरोप…
काही महिन्यांआधी सुरेश पाडवी यांनी भाजप उपजिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी बहूजन विकास आघाडीत कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर सुरेश पाडवी यांना डहाणू मतदार संघाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना बहुजन विकास आघाडीचे पालघर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. डहाणू मतदारसंघात पाडवी यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीचा जोरदार प्रचार केला होता. मतदारसंघामध्ये पाडवींचा चांगला दबदबा आहे.
विनोद तावडेंच्या डायरीत 15 कोटी; क्षितिज ठाकूर यांचा गंभीर आरोप; विरोधक आक्रमक
मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर सुरेश पाडवी यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं आता डहाणूमध्ये राजकीय समीकरणे बदलणार आहेत. एका बाजुला पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटला, असा आरोप बहुजन विकास आघाडीकडून केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला आता सुरेश पाडवी यांनी बहुजन विकास आघाडीची साथ सोडत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या आहेत. सुरेश पाडवी यांच्या भाजप प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीतील समीकरणं पुन्हा एकदा नव्यानं रचली जात आहेत. भाजपला मिळालेला पाठिंबा विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जातोय. डहाणूतील मतदारांवर या बदलाचा काय परिणाम होतो, हे चित्र आता 23 तारखेलाच स्पष्ट होईल.