Download App

‘तुमच्या टिनपाटांना बुचं लावा, अन्यथा जशाच तसे…’ उद्धव ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray on Narayan Rane: काल रात्री मी, आदित्य आणि शिवसैनिक हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन आलो. त्यावेळी सरकारकडून किंवा महापालिकेकडून कोणीही फिरकले नव्हते. शिवसैनिकांनी फुलांची सजावट केली होती. आज सकाळी मिंध्ये गेले असतील.क्रियाक्रर्म करायचे म्हणून दुमखलेल्या चेहऱ्याने हुतात्मा चौकाला मानवंदना करुन आले असतील. त्यांना मला सांगायचं की या हुतात्मांनी बलिदान दिले नसते तर तुम्ही गद्दारी करुन मुख्यमंत्री झाले नसता, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

मोरारजी देसाई नावाचा एक नरराक्षस खुर्चीवर बसलेला होता. मुंबई आणि गुजरातमध्ये गोळीबार केला होता. अनेक लोकांचा मृत्यू झाला. मुंबईचा इतिहास विसरलो तर हे मुंबईचा लचका तोडायला कमी करायचे नाहीत. मला मिध्येंना सांगायचे आहे की त्यावेळी लढणाऱ्या लोकांमध्ये जी हिंमत होती त्यातील कणभर हिंमत तरी तुमच्याकडे घ्या. बुड टेकायला खुर्ची मिळाली म्हणून तुम्ही मुंबईवरील आत्याचार मिंध्ये होऊन बघत बसणार असाल तर याद राखा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेंवर केली.

नक्षलवाद वैचारिक नव्हे, तर देशविरोधी लढाई, चकमकीनंतर Fadnavis थेट छत्तीसगडच्या सीमेवर

कर्नाटकची निवडणूक रंगात आली आहे. त्यावेळी आपल्या पंतप्रधानांनी भाषणात सांगितले की काँग्रेसने 91 वेळा शिव्या दिल्या. शिव्याचे समर्थन करत नाही पण ज्यावेळी तुमची टिनपाटं मला, आदित्यला आणि माझ्या कुटुंबाला जे रोज बोलत आहेत. त्यांच्याबद्दल तुमचं तोंड का गप्प बसलं आहे. ते ज्या भाषेत बोलत आहेत त्या भाषेत आमचा शिवसैनिक बोलेला नाही. आम्ही तुमचा मान ठेवतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुमच्या त्या टिनपाटांना जी भोकं पडलेली आहेत त्यामध्ये बुचं घाला. म्हणजे सगळं चांगलं होईल. तुमची लोकं वाटेल ते बोलणार आणि आमची लोकं देखील बोलणारचं, अशी असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारला बाकीच्या कामात रस; अजित पवारांची घणाघाती टीका

वज्रमूठ सभेचा हिसका गेल्या काही दिवसांत पाहिलेला आहे. विधान परिषद निवडणूक, कसब्याची निवडणूक, बाजार समित्यांची निवडणूकीत ह्यांना चारीमुंड्याचीत केलं आहे. ही वज्रमूठ सभेची कमाल आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. मुंबईला जर कुणी तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

Tags

follow us