शिंदे-फडणवीस सरकारला बाकीच्या कामात रस; अजित पवारांची घणाघाती टीका
Ajit Pawar On Shinde fadnavis Sarkar : मुंबईमधील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा (Vajramooth Sabha)सुरु आहे. त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीला एकत्र राहून निवडणुका लढवण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं आहे.
Sanjay Raut : दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार
मुंबई महाराष्ट्राची राजधानी असली तरी ही काही सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी अनेकांनी आपला जीव दिला आहे. मुंबईचा मान सन्मान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली. शिवसेनेमुळं मुंबई टिकली.
मुंबईत मराठी माणसाचा अभिमान मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहिला. मराठी माणूस एकजूट करुन राहिला हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. आणि हेच नेमकं काहींच्या डोळ्यावर यायला लागलं. काही लोकांना फोडण्याचं राजकारण झालं.
अशा पद्धतीनं राजकारण करुन उद्याच्या काळामध्ये आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान योग्य पद्धतीनं राहणार आहे का? कायदा काय राहणार आहे? घटना राहणार आहे का? याचाही विचार तुम्ही मी केला पाहिजे, असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.