Uddhav Thackeray on Gulabrao Patil : काहींना वाटते की ते म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार पण अशा घुशी आम्ही खुप पाहिल्या आहेत. अशा घुशींच्या शेपटीला धरुन राजकारणात आपटायच्या आहेत. निवडणूक आल्यावर प्रचार कार्यकर्ते करतात, कार्यक्रर्ते राबतात आणि निवडणूक आल्यावर हे टिकोजीराव वर बसतात गुलाबो गँग. घोड्याच्या लाथा कार्यकर्त्यांनी खायच्या आणि ह्यांनी घोडेस्वारी करायची हे चालणार नाही. ह्यांना घोड्यावर जसं चढवलं होतं तसंच आता खाली खेचायची वेळ आली आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केला.
उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. ते पाचोरा येथील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. ते पुढं म्हणाले की, तुम्ही निवडून दिलेले ते गद्दार झाले. निवडून गेलेले गद्दार झाले पण निवडून देणारे मतदार माझ्यासोबत आहेत. ज्यांनी तुमच्या निष्ठेला कलंक लावला, आपल्या भगव्याला डाग लावला. हा कलंक धुवायचा आहेच पण कलंक लावणारे हात राजकारणात आपल्याला कायमचे गाडून टाकायचे आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केला.
पालकमंत्री बालक मंत्र्यासारखे वागतात; सुषमा अंधारेंनी घेतला गुलाबराव पाटील, राज ठाकरेंचा समाचार
आर ओ तात्या सारखा निष्ठावान आणि प्रमाणिक शिवसैनिक जाणं हे फार मोठ नुकसान असतं. 40 गद्दार गेले तरी फरक पडत नाही. एक विश्वासू माणूस जातो त्यावेळी मोठा फरक पडतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आज गर्दी पाहिल्यानंतर पाकिस्तानला विचारले शिवसेना कोणाची तर पाकिस्तान पण सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणुक आयुक्तांना हे कळत नाही. तो त्यांचा दोष आहे. त्यांचा दृतराष्ट्र झाला असेल पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारेंची नक्कल करत ’50 खोके, एकदम ओके’ च्या सभेच्या गर्दीला द्यायला लावल्या.