पालकमंत्री बालक मंत्र्यासारखे वागतात; सुषमा अंधारेंनी घेतला गुलाबराव पाटील, राज ठाकरेंचा समाचार

पालकमंत्री बालक मंत्र्यासारखे वागतात; सुषमा अंधारेंनी घेतला गुलाबराव पाटील, राज ठाकरेंचा समाचार

The guardian minister acts like a child minister : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जळगाव जिल्ह्यात सभा सुरू आहे. या सभेआधी शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चांगलीच जुंपली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी चौकटीत बोला, अन्यथा तुमच्या सभेत घुसू, असा धमकी वजा इशारा ठाकरे गटाला दिला होता. दरम्यान, आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी सभेत बोलतांना गुलाबराव पाटलांचा चांगलाच समाचार घेतला. पालकमंत्री हे बालक मंत्र्यासारखे वागतात, अशी टीका त्यांनी केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, पालकमंत्री हे चौकटीत राहण्याचा इशारा देत आहेत. मात्र, पालकमंत्र्याने संविधानिक चौकट पाळायची असते. बालिश विधानं करणाऱ्या पालकमंत्र्यांना हे कसं कळेल…. पालकमंत्री हेच जर बालक मंत्र्यासारखे वागत असतील तर आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, असा सवाला त्यांनी केला.

त्या म्हणाल्या की, आजची सभा ही दिवंगत आर ओ पाटील हयात असतांनाच होणार होती. त्यासाठी नियोजनही सुरू झालं होतं. सभेची तयारी सुरू झाली. त्या सभेसाटी उद्धव ठाकरेंना खास निमंत्रण दिलं जाणार होतं. मात्र, आर ओ पाटील याचं निधन झालं. त्यामुळं ती सभा झाली नाही. त्यांच्यानंतर बरचं काही झालं. खोके आणि खुर्च्या माणसाला निष्ठा बदलायाला भाग पाडतात. काहींनी पैशांच्या लोभापायी आपली निष्ठा गहान ठेवली, अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला. अंधारे म्हणाल्या, मात्र, त्यांच्या कन्या वैशालीताई सुर्यवंशी शिवसेनेच्या वाटेवर राहिल्या. त्यांच्या प्रयत्नाने ही सभा होत आहे. आज त्यांच्या पाठीशी पक्ष अत्यंत ठामपणे उभा आहेत.

RCB vs RR: रोमहर्षक सामन्यात बंगळुरूने राजस्थानचा 7 धावांनी केला पराभव, हर्षल पटेलने घेतले 3 बळी

यावेळी त्यांनी शिंदेगटावर टीकास्त्र डागलं. त्या म्हणाल्या की, या सभेच्या आधी बऱ्याच वल्गना झाल्या. माध्यमे आम्हाला सांगायची की, सभा रद्द होण्याचे प्रयत्न सुरूआहेत. म्हटलं कोण रद्द करणार आहे सभा? स्टेशनवर काही आठ-दहा टाळक्यांनी काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी त्यांनी फोन केले की, आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत…. मग पोलिसही तिथं आले… प्रेसवालेही आले…. ही फक्त नोटंकी होती. सभेला गर्दी होणार नाही, असं शिंदे गट सांगत होता. ज्यांना शंका वाटते किती, खुर्च्या आहेत, हे जातीनं यावं अन् मोजावं. ता किशोर आप्पांनी यावं अन् खुर्च्या मोजाव्या. आम्ही आप्पांना अडवणार नाही, असा टोला त्यांनी किशोर पाटलांना लगावला.

कोरोना काळातही सरकारकडून हलगर्जीपणाच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांमध्येही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो. उगाच यात राजकारण करण्याची गरज नाही, असं सांगत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. त्यावर अंधारे यांनी कडक शब्दात टीका केली. त्या म्हणाल्या, राज दादा, कोरोना संकट हे निसर्गनिर्मित होतं. पण, खारघर सभेत जे बळी गेले, ते मानवनिर्मित होते. कारण, शिंदेंच्या सभेंना हल्ली गर्दी होत नव्हती. मग धर्माधिकारी यांच्या अनुयायांना बोलावून गर्दी करायची, अन् केंद्रातल्या लोकांना खुश करायचं ही नीती या कार्यक्रमात वापरली गेली. त्यामुळं खारघर दुर्घटना ही फडणवीस आणि शिंदे निर्मित आपत्ती आहे. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यांच्यावर करा, असं ठणकावलं.

कोराना काळाज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी काम केलं, ते वाखान्याजोगं आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेतल्या गेली. मोदींनीही त्यांचं कौतूक केलं. हलगर्जीपणा कोणाकडून झाला असेल तर गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये ज्यांनी रस्त्यावर प्रेत जाळली, त्या भापजच्या मुख्यमंत्र्याकडून हलगर्जीपणा झाला. उत्तर प्रदेशात नदीवर प्रेत तरंगली. त्यांच्याकडून झाला. त्यामुळं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची असेल तर त्यांनी योगी आदित्यानाथ यांच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा नोंदवण्याची मागणी करावी. कोरोनाचा काळ सुरू असतांना पीएम फंडात पैसे भरा, असं फडणवीस यांनी सांगितले. तेव्हा राज ठाकरे आपण फवडणीसांना राजकारण करू नका, असं का सांगितलं नाही. कोरोना काळात वारीच बंद आहे, असं दाखवत अस्थिरता प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना आपण राजकारण करू नका, असं का सांगितलं नाही? असा सवाल त्यांनी केला.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube