RCB vs RR: रोमहर्षक सामन्यात बंगळुरूने राजस्थानचा 7 धावांनी केला पराभव, हर्षल पटेलने घेतले 3 बळी

  • Written By: Published:
RCB vs RR: रोमहर्षक सामन्यात बंगळुरूने राजस्थानचा 7 धावांनी केला पराभव, हर्षल पटेलने घेतले 3 बळी

RCB vs RR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL च्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने राजस्थानला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र 20 षटकात राजस्थान 182 धावांपर्यंतच मजल मारू शकली. आरसीबीच्या विजयाचे नायक होते ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस, ज्यांनी शानदार खेळी केली. मॅक्सवेलने 77 आणि फाफ डू प्लेसिसने 62 धावांचे योगदान दिले.

190 धावांच्या पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या एका धावेवर जोस बटलरची विकेट गमावली. बटलर खाते न उघडता मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर यशस्वी जसवाल आणि देवदत्त पडिक्कल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी झाली. पडिक्कलने 34 चेंडूत 52 धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. डेव्हिड विलीने पडिक्कलला बाद करून ही भागीदारी तोडली.

काही वेळाने हर्षल पटेलने यशस्वी जैस्वालची विकेट घेतली. यशस्वीने 37 चेंडूत 47 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. यानंतर संजू सॅमसनने काही जोरदार फटके मारले, मात्र तो 22 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर हर्षल पटेलचा बळी ठरला. सॅमसन बाद झाला तेव्हा राजस्थानची धावसंख्या 15.2 षटकांत 4 बाद 125 अशी होती.

शेवटच्या षटकात 20 धावांची आवश्यकता होती

ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर यांच्यात 30 धावांची भागीदारी झाली, ज्यामध्ये ध्रुव जुरेलने अधिक योगदान दिले. हेटमायरने केवळ तीन धावा केल्या आणि तो सुयश प्रभुदेसाईच्या थ्रोवर धावबाद झाला. हेटमायरच्या धावबादमुळे राजस्थानच्या आशांना मोठा धक्का बसला. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 20 धावांची गरज होती. हर्षल पटेलच्या त्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर आर. अश्विनने एकूण 10 धावा केल्या, मात्र चौथ्या चेंडूवर बाद झाला . यानंतर शेवटच्या दोन चेंडूंवर केवळ दोन धावा झाल्या.

समलिंगी विवाहाला बार कौन्सिल ऑफ इंडियाचा विरोध

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू डाव:

नाणेफेक हारल्यानंतर आरसीबी प्रथम फलंदाजीला उतरली आणि त्याची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार विराट कोहली बाद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर बोल्टने त्याच्या पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवर शाहबाज अहमदलाही 2 धावांवर बाद केले. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी मिळून डाव सांभाळला.

फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक

मॅक्सवेल आणि डु प्लेसिसमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी झाली. यशस्वी जैस्वालने डू प्लेसिसला धावबाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. डुप्लेसिसने 39 चेंडूंत 62 धावा केल्या, ज्यात आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. डु प्लिसनंतर काही वेळातच मॅक्सवेलही बाद झाला. मॅक्सवेलला अश्विनने जेसन होल्डरच्या हाती झेलबाद केले. मॅक्सवेलने 44 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. मॅक्सवेल बाद झाला तेव्हा आरसीबीची धावसंख्या 15 षटकांत 4 बाद 156 अशी होती.

आरसीबीचा संघ 200 हून अधिक धावा करेल असे वाटत होते, परंतु राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी अप्रतिम पुनरागमन करत आरसीबीला 9 विकेट्सवर 189 धावा करू दिल्या. शेवटच्या पाच षटकात केवळ 33 धावा झाल्या आणि या काळात आरसीबीचे पाच खेळाडू बाद झाले. राजस्थानकडून संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन खेळाडूंना बाद केले. त्याचबरोबर अश्विन आणि चहलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube