Download App

आधी भ्रष्टाचारी मंडळींवर आरोप करायचे, मग निर्लज्जपणे…; सामना अग्रलेखातून फडणवीसांवर टीकास्त्र

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Shikhar Bank Scam : अजित पवार यांच्याशी संबंधित कथित शिखर बँक घोटाळा (Shikhar Bank Scam) प्रकरणाचा तपास बंद करण्याची विनंती मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला केली आहे. यावरून ठाकरे गटाने भाजपसह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आधी भाजपने गंभीर आरोप केले आणि नंतर लगेचच अजित पवारांना (Ajit Pawar) महायुती घेतले, हा बदनामीचा प्रकार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अब्रुनकुसानीचा दावा करावा, असं सामना अग्रलेखात म्हटलं.

मोदी सद्रुमाच्या तळाशी जातात, पण मणिपूरला जात नाही; ठाकरेंची कडाडून टीका 

भाजपच्या मांडीवर! या शीर्षकाखाली आजच्या सामना अग्रलेख प्रकाशित झाला. यातून भाजपच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. आधी भ्रष्टाचारी मंडळींवर आरोप करायचे आणि नंतर निर्लज्जपणे त्यांना मांडीवर घेऊन बसायचं. गेल्या ७०-७५ वर्षांत झाले नसतील एवढे घोटाळे या दहा वर्षात झाले. गेल्या दहा वर्षांत खोटेपणाचे जेवढे उंच डोंगर उभे कले, त्यामुढं हिमालयाची उंचीही तोकडी पडेल, हर्षवर्धन पाटील, हसन मुश्रीफ यांच्याप्रमाणेच आता अजित पवारांनाही शांत झोप लागायला सुरूवात होईल, असा खोचक टीका अग्रलेखातून करण्यात आली.

Savani Ravindra : गोड गळ्याच्या सावनीचं ‘मनमोहक’ रूप, 

ज्या राज्य बॅंक घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस अजित पवारांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते, हा त्यांचा आत्मनिर्धार होता. त्या घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंडाळला, असा टोलाही सामनातून लगावलला. भाजपने अजित पवारांना एकापाठोपाठ एक दिलासा देण्याचा सपाटाच लागला, असंही अग्रलेखात म्हटलं.

फडणवीस यांनी अजित पवार यांच्या कथित बँक घोटाळ्यांवर तांडव केलं होतं. पवार आणि त्यांच्या गॅंगने महाराष्ट्रात जनतेचा पैसा लुटल्याचा आरोपच नव्हे तर आपल्याकडे पुरावे असल्याचं फडणवीस सांगत होते, आता त्या पुराव्याचे काय झाले? हे पुरावे त्यांनी गिळून ढेकर दिला की, आणखी काही केले? शिखर बँक घोटाळ्याचे पुरावे फडणवीसांनी नष्ट केले असतील तर त्या आरोपावरून फडणवीसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं अग्रलेखात म्हटलं. कारण ‘भ्रष्टाचार-भ्रष्टाचार’ असे ओरडत राहून जमिनीवर काठ्या आपटायच्या आणि माहौल तयार करायचा हे यांचे धंदे आहेत, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली.

समाजसेविका सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी, कुटुंबास मनस्ताप देऊन काकांच्या पाठित सुरा खुपसण्याच भाग पाडण्याच्या सबबीखाी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांवर अब्रुनुकसानीचा खटलाच चालवायला हवा, असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आला.

follow us

वेब स्टोरीज