Uddhav Thackeray : ‘मोदी इस्त्रायल युद्धावर चिंता व्यक्त करतात पण’.. ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच (Maratha Reservation) पेटला आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मागील दोन दिवसात राज्यांत मोठ्या घडामोडी घडल्या. हिंसक आंदोलनेही झाली. तर दुसरीकडे मणिपुरात परिस्थिती अजूनही शांत झालेली नाही. जम्मू काश्मिरात आतंकवादी हल्ले सुरू आहेत, असे असताना भाजप मात्र पाच राज्यांतील […]

'अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतील?' ठाकरे गटाचा मोदी सरकारला खोचक सवाल

'अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतील?' ठाकरे गटाचा मोदी सरकारला खोचक सवाल

Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच (Maratha Reservation) पेटला आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मागील दोन दिवसात राज्यांत मोठ्या घडामोडी घडल्या. हिंसक आंदोलनेही झाली. तर दुसरीकडे मणिपुरात परिस्थिती अजूनही शांत झालेली नाही. जम्मू काश्मिरात आतंकवादी हल्ले सुरू आहेत, असे असताना भाजप मात्र पाच राज्यांतील निवडणुकीच्या प्रचारात गुंतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरूनच आज ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काश्मिरातील हिंसाचाराकडे महाराष्ट्र, मणिपूरच्या आंदोलनाकडे बेफिकिरीने पाहणाऱ्या सरकरला देशाच्या मातीचे मोल काय कळणार?, असा सवाल या लेखात ठाकरे गटाने विचारला आहे.

काँग्रेसची 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर, राष्ट्रीय नेत्यांना उतरवले विधानसभेच्या मैदानात

मोदी इस्त्रायल युद्धावर चिंता व्यक्त करतात पण… 

सरकार राजकारणातील विरोधकांना जेरबंद करण्यात आणि निवडणूक प्रचारात अडकून पडले आहे व जम्मू काश्मीर, महाराष्ट्र आणि मणिपुरात भडका उडाला आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा, कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून पंतप्रधान आणि गृहमंत्री राजकारणात गुंतून पडले असतील तर देशात दुसरे काय घडायचे? मोदी(PM Modi) इस्त्रायल-हमास युद्धावर (Israel Hamas War) चिंता व्यक्त करतात. पण, मणिपूर, महाराष्ट्र, काश्मिरातील हिंसाचारावर मौन बाळगतात. गृहमंत्री शहा राजकीय विरोधकांचा भ्रष्टाचार कुदळ-फावडी घेऊन खणून काढतात व तुरुंगात टाकतात पण, देशात अतिरेकी व धर्माधांना मोकाट सोडतात, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

सरकारला मातीचे मोल काय कळणार ?

देशात सध्या मेरी माटी मेरा देश हा भाजप पुरस्कृत राजकीय उत्सव सुरू आहे. आपल्या जिल्ह्यातून मातीचा घेऊन भाजप कार्यकर्त्यांना दिल्लीत बोलावले आहे. मोदी त्यांच्यासमो भाषण करतील. पण, अनेक राज्यांतील कलशात फक्त माती नसून महिलांचे आक्रोश, आग, ठिणग्या, निरपराधांचे रक्त आहे हे लक्षात घ्या. काश्मिरातील हिंसाचाराकडे महाराष्ट्र मणिपूरच्या आंदोलनाकडे बेफिकिरीने पाहणाऱ्या सरकारला देशाच्या मातीचे मोल काय कळणार, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

‘फडणवीसांनी आधी राजीनामा द्यावा’; जाळपोळ घटनेवर एकनाथ खडसेंची सरकारला सुनावलं

Exit mobile version