काँग्रेसची 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर, राष्ट्रीय नेत्यांना उतरवले विधानसभेच्या मैदानात
Rajasthan Congress : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने उदयपूरमधून राष्ट्रीय प्रवक्त्याला तिकीट दिले आहे. याशिवाय काँग्रेसने सिवानामधून मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत पक्षाने एकूण 151 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
धोलपूर जिल्ह्यातील भासेरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने संजय कुमार जाटव यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार आणि एससी आयोगाचे अध्यक्ष खिलाडी लाल बैरवा यांचे तिकीट कट केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संजय जाटव यांना उमेदवारी दिली होती. आता पक्ष त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे.
मानवेंद्र सिंग यांचा मतदारसंघ बदलला
यावेळी काँग्रेसने जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांची जागा बदलली आहे. बाडमेरच्या सिवाना मतदारसंघातून पक्षाने मानवेंद्र सिंह यांना तिकीट दिले आहे. गेल्या वेळी काँग्रेसने मानवेंद्र यांना झालावाडच्या झालरापाटन मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्या विरोधात उभे केले होते. यावेळी त्यांना शिवनामधून उमेदवारी देण्यात आली आहे.
बारामुल्लामध्ये दहशतवादी हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल शहीद, घरात घुसून गोळी झाडली
गौरव वल्लभ यांची ताराचंद जैन यांच्याशी टक्कर
या यादीत उदयपूरमधून गौरव वल्लभ यांना तिकीट देण्यात आले आहे. येथे त्यांचा सामना भाजपचे ताराचंद जैन यांच्याशी होणार आहे. ताराचंद जैन यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर ते 1967 पासून संघात कार्यरत आहेत. 1977 मध्ये ते उदयपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रभारी होते. 1978 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा, जिल्हा कोषाध्यक्ष, 1980 मध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा कोषाध्यक्ष उदयपूर, 1985 मध्ये लोकसभेचे मेवाड प्रदेश प्रभारी, 1991 मध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष होते.
राजस्थान में होने वाले विधानसभा चुनाव, 2023 के लिए भारतीय राष्ट्रीय कांग्रेस द्वारा जारी उम्मीदवारों की सूची।#कांग्रेस_फिर_से#RajasthanAssemblyElection2023 pic.twitter.com/s3XUl57ZGU
— Rajasthan PCC (@INCRajasthan) October 31, 2023
भाजपचे उदयपूर देहाट हे तीन टर्म 1991 ते 2000 पर्यंत आमदार होते. ताराचंद जैन उदयपूर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार राहिले आहेत आणि सध्या ते आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या जवळचे मानले जातात.