Uddhav Thackeray : देश आणि राज्याच्या राजकारणात सध्या ‘पनौती’ हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. कोण कुणाला पनौती आहे यावरून खोचक टोलेबाजी सुरू आहे. याच शब्दाचा आधार घेत उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनातून मोदी सरकावर खोचक फटकेबाजी केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधानांना पनौती म्हटले व पनौती या शब्दाचे विश्लेषण केले. पनौती म्हणजे नकारात्मक व्यक्ती किंवा संकटकाल. भाजप ज्यास अमृततकाल वगैरे म्हणत आहे तो संकटकाल आहे व त्याचा पनौतीशी संबंध आहे. अहमदाबाद येथील क्रिकेट स्पर्धेतील भारताचा पराभव. आता हा पराभव कुणाच्या पनौतीमुळे झाला की कुठल्या पापी ग्रहांमुळे यावर ज्योतिषांनी जरुर खल करावा. सर्वसामान्य जनता मात्र 2014 पासून देशाच्या पाठीमागे लागलेल्या ‘पनौती’बद्दल गांभीर्याने विचार करत आहे एवढं मात्र खरं! अशा शब्दात मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray : अजितदादांना कशाचा ताप? सहकाऱ्यांचा की.. उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
पनौती म्हणजे काय रे भाऊ ?
राजस्थान आणि मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांनी मोदींचा उल्लेख ‘पनौती’ आणि ‘खिसेकापू’ असा केला. त्यामुळे भाजपवाले खवळले व त्यांनी निवडणूक आयोगास कारवाई करण्यास भाग पाडले. आयोग हा भाजप आयोगच झाला असल्याने अशा कारवायांचे आश्चर्य वाटायला नको. राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत मिश्कील शैलीत सांगितले की पीएम म्हणजे ‘पनौती मोदी’. ते क्रिकेट सामना पहायला गेले आणि आपण पराभूत झालो. भारतीय संघ चांगला खेळत होता पण पनौतीमुळे आपण हरलो.
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना ‘पनौती’ म्हटले व ‘पनौती’ या शब्दाचे विश्लेषण केले. ‘पनौती’ म्हणजे नकारात्मक व्यक्ती किंवा संकटकाल. भाजप ज्यास अमृततकाल वगैरे म्हणत आहे तो संकटकाल आहे व त्याचा पनौतीशी संबंध आहे. ‘साडेसाती’, ‘पनौती’, ‘छोटी’ पनौती हे शब्द भाजपाच्या नवहिंदू संस्कृतीशी संबंधित आहेत. मोदी हे काशीचे प्रतिनिधित्व करतात. तेव्हा काशीच्या पंडित मंडळींना बोलावून त्यांनी पनौतीचे सत्य समजून घेतले पाहिजे अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.
‘पनौती’ शब्द भाजपाच्या काळजात घुसला
‘पनौती’ हा शब्द भाजपाच्या काळजात घुसला व ते घायाळ झाले. पण याच मोदी व शहा यांनी याआधी काँग्रेस, गांधी परिवाराचा उल्लेख ‘राहू’ ‘केतू’, ‘राहुकाल’ असा केला आहेच. राहुल हे ‘पप्पू’ व ‘मुर्खांचे सरदार’ आहेत अशी दुषणे लावली गेली तेव्हा निवडणूक आयोग भाजप कार्यालयात डोळ्यांवर गोधडी ओढून झोपी गेला होता काय असा सवाल करत देशाला ‘पनौती’ लागली आहे व त्या पनौतीपासून राहुल गांधीच मुक्ती देऊ शकतील या विश्वासात लोक आहेत असेही या लेखात म्हटले आहे.