Download App

भ्रष्ट सरकारच्या बाजूने… भ्रष्टाचाराचे स्फोट अन् राळेगणचं दैवत; संजय राऊत अण्णा हजारेंना काय म्हणाले?

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut Criticized Social Worker Anna Hazare : ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अण्णा हजारेंवर (Anna Hazare) टीका केलीय. राज्यातील भ्रष्टाचारावरून त्यांनी अण्णा हजारेंना घेरलंय. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले, पण राळेगणमध्ये कूसही बदलली नाही. हे दुर्देवाने सांगायला लागतंय, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केलीय.

मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मागण्या मांडाव्यात पण मुख्यमंत्र्यांविषयी…मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम केलंय. नाहीतर त्यांनी कधी दिल्ली पाहिली नसती, रामलीला मैदान अन् जंतर मंतर रोड कधी पाहिला असता? असा सवाल संजय राऊतांनी (Maharashtra Politics) केलाय. आंदोलनाला आवाका दिल्यानंतर अण्णा हजारे देशाला माहित झाले. नाहीतर ते राळेगणचे दैवत होते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

पाणीप्रश्न अन् शेतीच्या प्रश्नावर अण्णा हजारे काम करत होते. भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईला केजरीवाल आणि सिसोदिया यांनी वाचा फोडली, अण्णा हजार त्याचं प्रतिक होते. त्यानंतर महाराष्ट्रात मोदी सरकार, शिंदे-फडणवीसांचं सरकार असताना भ्रष्टाचाराचे स्फोट झाले. पण राळेगणमध्ये अण्णांनी कूसही बदलली नाही, अशी नाराजी संजय राऊथ यांनी बोलून दाखवली आहे. अण्णा हजारे भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय. ते गांधीवादी आहेत. जर त्यांनी आताही सत्याची कास धरली तर आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असं देखील राऊतांनी बोलून दाखवलंय.

Tanaji Sawant : 68 लाखांचं बिल,पप्पा रागावतील म्हणून ऋषिराज… तानाजी सावंतांनी नेमकं काय सांगितलं?

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर देखील चर्चा केलीय. आनंदाचा शिधा, लाडका भाऊ या योजनांचे एकनाथ शिंदे देखील भाग होते. या योजना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंद करत आहेत. त्यामुळे यावर शिंदेंनी आवाज उठवला पाहिजे. गरिबांच्या योजना का बंद केल्या जात आहेत, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. तर अदानींच्या योजना सुरू राहतात, अशी टीका त्यांनी यावेळी केलीय.

 

follow us