फडणवीस सरकारला वठणीवर आणणारच! हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश…

छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफी करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा पार पडला.

Uddhav Thackeray Sabha

Uddhav Thackeray Sabha

Uddhav Thackeray Hambarda Morcha In Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफी करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा पार पडला. जमलेल्या माझ्या तमाम माता-भगिणींनो असं म्हणत शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभेला सुरूवात केली. फडणवीस सरकारला वठणीवर आणणारच, असं म्हणत ठाकरेंनी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. सरकारने जे पॅकेज जाहीर केलंय, ती मदत शेतकऱ्यांना मिळाली का? याची चौकशी गावोगावी, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात जावून करा, असं सांगितलं आहे.

सरकार कर्जमुक्ती करत नाही…

राजा उदार झाला अन् हातात टरबूज दिलं, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलीय. मेहनत शेतकरी करणार, सत्तेतून अंडी हे उगवणार. 15 दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो होतो. पाच एक जिल्ह्यात शेतकऱ्यांना (Uddhav Thackeray) भेटलो होतो. तेव्हाच जाहीर केलं होतं की, जोपर्यंत हे सरकार कर्जमुक्ती करत नाही, तोपर्यंत सरकारला सोडत नाही.  परंपरेप्रमाणे दसरा मेळावा घेतला. पाऊस पडत असताना मेळावा चिखलात घेतला. आज तर कडक ऊन आहे. मेळाव्याच्या वेळी विचारलं लोकं चिखलात कसे बसणार. शेतकरी ऊन, वारा, पावसात अन्नधान्य पिकवतो. त्यांचं आयुष्य चिखलात (Chhatrapati Sambhajinagar) असतं. आपण साधी सभा घेऊ शकत नाही असंही भावनिक भाष्य यांनी हंबरडा मोर्चात केलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली, त्याचे पोस्टर लागले आहेत. यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, त्या पोस्टरवर शेतकऱ्यांचा फोटो नाही. सरकार स्वत:ची पाठ खाजवून घेत आहे. आपण 50 हजार हेक्टरी मदत ज्यांनी 50 खोके घेतले, त्यांच्याकडे मागत आहोत, हे लक्षात घ्या.  तुम्ही जो चाबूक दिलाय, तो चालवल्यानंतरच हे वठणीवर येतीस. हे असे-तसे वठणीवर येणार नाहीत, असा घणाघात ठाकरेंनी केलाय.

बोलणाऱ्यांना बोलू द्या…

शिवसेना प्रत्येक संकटाच्यावेळी तुमच्यासोबत उभी राहील, बोलणाऱ्यांना बोलू द्या. संकटाशी लढल्याशिवाय राहणार नाही, असं देखील ठाकरेंनी स्पष्ट केलंय.  50 हजार मदत मागितली, याचं मला काय स्वप्न पडलं नव्हतं? मी शेतकऱ्यांना विचारलं होतं, असं देखील बोलताना ते म्हणाले.

सत्तेत एक फुल दोन हाफ बसलेत… 

महायुती सरकारच्या पीकविमा योजनेला यावेळी त्यांनी घेरलं. शेतकरी मेला, तरी विम्याचे पैसे मिळणार नाहीत. असे विम्याचे निकष असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय. तर 50 खोके घेणाऱ्यांनी हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी देखील केली. सरकारने जाहीर केलेलं पॅकेज ही इतिहासातील सर्वात मोठी थाप आहे. विरोधी पक्ष नेत्यावरून ठाकरेंनी फडणवीस सरकारला डिवचत म्हटलं की, आम्ही उपमुख्यमंत्र्यांना मानत नाही…. सत्तेत एक फुल दोन हाफ बसलेत. परीक्षा शुल्क नव्हे, तर फी माफ केली पाहिजे. कर्ज माफ केले पाहिजे, असं देखील यावेळी ठाकरेंनी स्पष्ट केलंय. जमीन खरडून गेली, अशा शेतकऱ्यांना 3 लाख रुपजे जाहीर केले, त्यापैकी 1 लाख रुपये शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी द्या, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Exit mobile version