Download App

अत्याचाराची जबाबदारी याचिकाकर्ते, न्यायालय घेणार का ? बंद मागे घेतो पण… उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

Uddhav Thackeray: आरोपी आणि गुन्हेगारांबाबत तसे वाटायला हवे गुन्हेगारांना लगेच शिक्षा देण्याची तत्परता उच्च न्यायालयाने दाखवली पाहिजे.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray On Maharashtra Bandh Bombay HC issues order: उद्याच्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombai High Court) नकार दिल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. आता शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. परंतु राज्यभर निदर्शने केली जाईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले आहे. महिलांवरील अत्याचाराची जबाबदारी याचिकाकर्ते आणि उच्च न्यायालय घेणार आहे का ? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केलाय.

‘या’ दिवशी समरजित घाटगे करणार राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश, जयंत पाटलांची मोठी घोषणा

बदलापूर येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मविआकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मविआला (MVA) दणका दिला आहे. कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडली. त्यानंतर बंद मागे घ्यावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले. तर ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, थोड्यावेळापूर्वी उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केली आहे. तत्परतेने हा निर्णय घेतला गेला. आरोपी आणि गुन्हेगारांबाबत तसे वाटायला हवे गुन्हेगारांना लगेच शिक्षा देण्याची तत्परता उच्च न्यायालयाने दाखवली पाहिजे.

पवारांच्या नेतृत्वात प्रामाणिकपणे काम करणार अन् विधानसभा जिंकणार; समरजित घाटगेंना विश्वास

न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. पण न्यायालयाचा आदर ठेवावा लागतो. या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. या बंदचे कारण ही वेगळे होते. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे ही वेळ नाही. अपील केले तरी सुनावणी नीट झाली पाहिजे. जनतेचा मनात जो आक्रोश आहे, संताप आहे, तो उफाळून आलातर सर्वांचेच कठीण जाईल. बंद मागे घेतला असला तरी राज्यभर गावात, शहरात मुख्य चौकात निदर्शन केले जातील. महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती लावून, हातात काळे झेंडे घेऊन सगळ्या गोष्टीचा निषेध करू. बंदला तुम्ही बंद म्हणता तर आम्ही तोंडच बंद ठेवते. या निर्णयावर घटनातज्ज्ञांनी चर्चा केली पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

follow us