“भाजप आणि मनसे एकत्र येऊ नये म्हणून काही लोकांनी २०१४ साली २०१७ साली काही चाली खेळल्या आहेत. कारण हे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आले तर हे दोन पक्ष एकत्र आले तर आपलं काय होईल याची उद्धव ठाकरे यांना भीती आहे.” असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
काल विधिमंडळ परिसरात योगायोगाने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यावरून संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. काल घडलेला हा योगायोग नव्हता तर उद्धव ठाकरे यांनी मुद्दाम घडवून आणलेला योगायोग आहे. अशी टीका त्यांनी केली. यावेळी ते म्हणाले की “भाजप आणि मनसे एकत्र येऊ नये म्हणून काही लोकांनी २०१४ साली २०१७ साली काही चाली खेळल्या आहेत. कारण हे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आले तर हे दोन पक्ष एकत्र आले तर आपलं काय होईल याची उद्धव ठाकरे यांना भीती आहे.”
विधानपरिषदेत खडाजंगी! खडसे म्हणाले, सीएमकडूनच उत्तर हवं; गुलाबराव म्हणाले, ‘उगाच चार वेळा…..’
यावेळी गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंच्या भाषणावरून देखील संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की परवा गुढीपाडवा झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या भाषणानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यामध्ये उद्धव ठाकरे याची प्रतिक्रिया आली आहे. तुम्हाला पाठीत खंजीर खुपसायची सवय झालेली आहे. तुम्ही अगोदर राणे यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यानंतर राज ठाकरे यांच्या सुद्धा पाटीत खंजीर खुपसला. तसेच भाजपच्या सुद्धा पाठीत खंजीर खुपसला आणि ज्यांनी मतदारांनी निवडून दिले आहे, त्यांच्या सुद्धा पाठीमध्ये खंजीर सुपसला आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांना तुमच्याकडे उत्तर नाहीत. त्यामुळे तुम्ही पांचट दर्जाचे विचार करून, तशा प्रतिक्रिया देऊन उत्तर टाळली, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
ठाकरे- फडणवीस एकत्र येताच पत्रकाराने थेट विचारले नवी युती का?
माहीम येथील अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर शिवसेनेकडून जी प्रतिक्रिया आली त्यावर बोलताना. त्यावर देखील देशपांडे यांनी टीका केली. ते म्हणाले की माहिम मधील हे बांधकाम २००७ साली झालं असं मानलं तरी तुम्ही इतके वर्षे काय केलं. ज्या महापौर बंगल्यावर तुम्ही इतके वर्षे बसत होता. तिथून हे अनधिकृत बांधकाम दिसत होत. त्यावर तुम्ही का कारवाई केली नाही ? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
तुम्ही महापौर बंगल्यावर बसत होता पण तुमचं लक्ष महापौर बंगल्यावर होत, तुम्हाला तो पाहिजे होता. म्हणून तुमचं लक्ष अनधिकृत बांधकामाकडे गेलं नाही. असा आरोप त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचावर केला.