Download App

मोदी सद्रुमाच्या तळाशी जातात, पण मणिपूरला जात नाही; ठाकरेंची कडाडून टीका

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे अजूनही मणिपूरला गेले नाहीत. पण, ते लक्षद्वीपला जाऊन समुद्रात डुबकी मारतात. द्वारकेत खोल समुद्रात गेले. मोदी समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात, पण मणिपूरला जाऊ शकत नाहीत, असा घणाघाती हल्ला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकर (Uddhav Thackeray) यांनी केला आहे.

समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन, आता मुंबई ते शिर्डी प्रवास होणार वेगवान 

देव डोळ्यसमोर ठेवतात, देश नाही…
आमदार कपिल पाटील यांनी नवा पक्ष काढला. त्यानिमित्त धारावीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, एकच प्रोडक्ट किती वेळा लॉन्च करणार? कितीही वेळा घासले तरी त्यातून काय बाहेर पडणार? मोदींशिवाय भाजपकडे कोण पर्याय कोण? मोदींविरोधात आम्ही एकत्र आलो नाही. आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात आहोत. हुकूमशाहीला लोकशाही हाच पर्याय आहे. आम्ही देशभक्त म्हणून एकत्र आलो आहोत. देश वाचवा, देश वाचला-टिकला तरच आपला धर्म टिकवू शकतो. देश वाचवणे हाच आमचा धर्म आहे. माझे आजोबा म्हणायचे की देश डोळ्यासमोर ठेवा. आशीर्वाद द्यायला देव पाहिजे. पण हे देव डोळ्यासमोर ठेवतात अन् देश कुठे आहे? असा सवाल ठाकरेंनी केला.

Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता 

भाजपकडे 8 हजार कोटी कुठन आले?
काँग्रेसवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे भाजपला अक्षरश: ठाकरेंनी झोडपून काढलं. जे काँग्रेसला 10 वर्षात जमलं नाही, ते भाजपनं करून दाखवं. आणि वर हे कॉंग्रेसला भ्रष्टाचारी म्हणत आहेत. गेल्या दहा वर्षात भाजपकडे 8 हजार कोटी कुठन आले? कशासाठी आले, असा सवाल ठाकरेंनी केला आहे

मी रणांगणात उतरलो आहे. तुम्ही सर्व सोबत आहात. आता ही लढाई एकट्याची नाही. मला पंतप्रधान व्हायचे आहे म्हणून नाही. भावी पिढ्यांसाठी हा लढा आहे. तुमच्या पिढ्या या देशात राहतील. त्या लोकशाहीने राहणार की हुकूमशाहीने राहणार, हे ठरवणारी ही लढाई आहे. हुकूमशाहीचं थडगं शिवरायांचा महाराष्ट्र बांधल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ठाकरेंनी दिला.

मोदींची गॅरंटी म्हणजे जुमला
मोदींनी गेल्या १० वर्षांत फक्त नामांतर केली. त्यांनी योजनांची नावं बदलली, स्टेशनची नावं बदलली. आता त्यांनी जुमल्यानंच नावही गॅरंटी ठेवलं, मोदींची गॅरंटी म्हणजे जुमला, असा टोला ठाकरेंनी लगावला.

 

follow us