Uddhav Thackeray : जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी पक्षाचा राजीनामा दिल्या. त्यानंतर त्यांनी आज आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत समाजवादी रिपब्लिक पार्टी या नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरेंनी एनडीएमध्ये सामील झालेल्या नितीशकुमार यांच्यासह भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करतांना म्हणाले की, कपिल पाटील यांनी त्यांची हौस भागण्यासाठी नाही तर देशाला लढवय्यांची गरज असतांना पक्ष काढला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं नाव समाजमवादी गणराज्य ठेवलं. मला बरेच लोक मला विचारतात की तुमचा नेमका विरोध कशाला आहे? तर आता मी कपिल यांच्या पक्षाचं नाव घेऊन सांगतो की, आता माजवादी विरुध्द समाजवादी अशी लढाई आहे. एका बाजूला समाजवादी आहेत, अन् दुसऱ्या बाजूला माजवादी आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली.
अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग अन् अंबानी कुटुंबियांचं नृत्य ते कलाकारांची मांदीयाळी; पाहा फोटो
पुढं बोलतांना ठाकरे म्हणाले की, नितीशकुमार किंवा अशोक चव्हाण आपल्याला सोडून भाजपमध्ये जातील, असे कधी वाटले नव्हते. कारण सर्वप्रथम नितीशकुमार माझ्या घरी आले होते आणि त्यांनी देशात भाजपविरोधात आघाडी उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. इंडिया आघाडीची सुरुवात चांगली झाली होती. दोन-तीन बैठका झाल्या आणि नंतर ते भाजपसोबत गेले. त्यांनी पटली मारली तर कपिल पाटलांसारखे समाजवादी आपल्यासोबत आहेत.
जुमल्यानंच नावही गॅरंटी ठेवलं,
ठाकरे म्हणाले, पंचवीस-तीस वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होतीच, पण दोन वेळेला आम्ही मोदीजींच्या त्या सगळ्या भूलथापांना भुललो होतो. मोदींकडून फक्त फसवाफसवी सुरू आहे. आम्हीही भाजपला पाठिंबा दिला आणि पदरात काय पडलं? धोंडे पडले असते तरी चालले असते. कारण धोंड्याला शेंदरू फासलं तर देव तरी होतो, याचं काय? नुसतं गेल्या दहा वर्षांत फक्त नामांतर झालेली आहेत. योजनांची नावे बदला, स्टेशनचं नावं बदला,भाजप फक्त योजना किंवा गावांची नावे बदलत आहे. आता त्यांनी जुमल्यानंच नावही गॅरंटी ठेवलं, असा टोला ठाकरेंनी लगावला. मोदींची गॅरंटी म्हणजे जुमला. ते समुद्राच्या तळाशी जातात. पण, मणिपूरला जात नाहीत, असंही ठाकरे म्हणाले.
तर असंतोषाचा भडका
भाजपविरोधात जनतेत नाराजी आहे. शेतकरी, मजूर, विद्यार्थी सगळेच आक्रोश करत आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की ईव्हीएमचे काय होणार? ईव्हीएममध्ये घोटाळा करतील आणि ते जिंकतील, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. भाजपने ईव्हीएम घोटाळा केला तर जनतेत असंतोष निर्माण होईल. ईव्हीएम घोटाळा करून सत्तेत याल तर असंतोषाचा भडका उडेल, असा थेट इशाराही ठाकरेंनी दिला.