Download App

उद्धव ठाकरे कुटुंबाचं पहिल्यांदाच काँग्रेसला मत?, म्हणाले जुमलेबाजीला लोक कंटाळले

भाजप शिवसेा युती असताना कायम युतीच्या किंवा आपल्या उमेदवारा मतदान करणारे उद्धव ठाकरे कुटुंबाने या निवडणुकीत प्रथमच काँग्रसला मतदान केल आहे.

Fifth Phase Lok Sabha Polls : देशभरात आज पाचव्या टप्प्यात तर राज्यात अंतिम टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. राज्यात मतदान पार पडत असलेल्या 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मुंबईतील सहा जागांचा समावेश आहे. यापैकी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढत चुरशीची मानली जात आहे. ठाकरे घराण्याचा उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ आहे. दरम्यान राज्यातील राजकीय समिकरण बदलल्याने या निवडणुकीत उद्धव ठाकरे कुटुंबाने प्रथमच काँग्रेस (हाताचा पंजा)वर मतदान केले आहे.

 

पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, राज्यात 13 जागांसाठी मतदान; दिग्गजांच भवितव्य पणाला

पंजा या चिन्हावर शिक्का

आतापर्यंत या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार उभा राहत असल्याने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला कधीच मतदान केलं नव्हतं. परंतु, यंदा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत आहेत. जागावाटपात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हावर शिक्का मारला आहे.

 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे वांद्रे येथील कलानगर परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान करुन बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, देशातील लोक जुमलेबाजीला कंटाळले आहेत. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी बाहेर पडून मतदानाचा हक्क अबाधित राहावा, यासाठी ते मतदान करतील. जुमलेबाजांनी प्रचंड पैसा वाटला आहे. मात्र, मतदान पैशांचा पाऊस स्वीकारणार नाहीत. पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

 

अरे जा ना तिकडे, तेच घिस पिटं वाक्य..; मतदानानंतर राज ठाकरे पत्रकारांवर चिडले

आदित्य ठाकरे मतदानानंतर काय म्हणाले?

आम्ही देशासाठी मतदान केलं आहे, संविधान रक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी मतदान केलं आहे. तुम्हीही मतदान करा, हा तुमचा हक्क आणि अधिकार आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा आहेत, मतदार बाहेर येतील आणि मतदान करतील. काही ठिकाणी मतदार यादीत गोंधळ दिसतोय, ऊन आहे, सावलीसाठी मंडप वगैरेची सोय करायला हवी. निवडणूक आयोगाने तयारी करायला हवी होती, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

follow us