Download App

पवारांच्या निवृत्तीचा ठाकरे गटाला बसणार ‘हा’ फटका

Uddhav Thackeray will be hit by Pawar leaving the post of NCP president : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या घोषनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, 5 तारखेला त्यांचा राजीनामा मंजुर होणार की, नाही कळेल.

पवारांच्या या घोषनेनंतर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पवारांच्या राजीनाम्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होईल, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, शिवसेनेलाही याचा मोठा फडका बसू शकतो.

सुहास पळशीकर यांच्या मते, शरद पवार हे महाविकास आघाडीचे पालक म्हणून आतापर्यंत वावरत होते. पण महाविकास आघाडीचं नेतृत्व हे उध्दव ठाकरेंकडे होतं. पवारांनी पक्षाचा राजीनामा दिला तर महाविकास आघाडी असणार नाही. पक्षाच्या जबाबदारीतून त्यांची मुक्तता झाली, तरी विरोधी पक्षांची व्यापक युती करण्यासाठी पवार प्रयत्नशील राहतील. आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सुरू राहणं हे त्या प्रयत्नांसाठी महत्त्वाची ठरेल.

Shegaon : संत गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! आजपासून ‘आनंद सागर’चे अध्यात्मिक केंद्र खुलं

दुसरी गोष्ट म्हणजे, महाविकास आघाडीत वाटाघाटी करण्यासाठी नवा अध्यक्ष बसणार, असं म्हटल्यानंतर जागांची मागणी करणं, वेगवेगळ्या मतदारसंघांचा आग्रह धरणं, सत्ता मिळत असेल तर मंत्रिपदाचा आग्रह धरणं, या सगळ्यांवेळी महाविकास आघाडीत तणाव निर्माण होणार हे निश्चित. आता ठरलेल्य व्यवस्था बिघडणार आणि याचा बळी शिवसेनेलाच बसणार, याची तयारीही शिवसेनेला करावी लागणार आहे.

विशेषत: शिवसेनेत फूट पडल्याने आणि ठाकरेंची ताकत क्षीण झाल्यानं, त्यांना हे सतत ऐकावं लागेल की, तुमची ताकत कमी झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा महाविकास आघाडीला होईल, मात्र शिवसेनेला मिळणाऱ्या जागा कमी करून त्या जागा काबीज करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल. त्यामुळे तणाव नक्कीच वाढेल. त्या तणावामुळे महाविकास आघाडी संपुष्टात येईल, यात शंका नाही. अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले तर महाविकास आघाडीत तणाव निर्माण होणार हे निश्चित, असं पळशीकर यांनी सांगितले.

 

Tags

follow us