Shegaon : संत गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! आजपासून ‘आनंद सागर’चे अध्यात्मिक केंद्र खुलं

Shegaon : संत गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! आजपासून  ‘आनंद सागर’चे अध्यात्मिक केंद्र खुलं

Aanad sagar Garden Spiritual center open In Shegaon : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या शेवगावला संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. हे राज्यातील मोठ देवस्थान आहे. याच मंदिर परिसरात 2001 साली शेवगावच्या संत गजानन महाराज संस्थानने तब्बल 200 एकरमध्ये हे ‘आनंद सागर’ उद्यान उभारलेलं आहे. सरकारकडून जमीन घेऊन हे उद्यान उभारण्यात आलं आहे. यामागे शेगावला धार्मिक आध्यात्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळावी हा उद्देश होता. यामुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर आले आहे.

मात्र काही काळापूर्वी हे उद्यान बंद करण्यात आलं होत. भक्त आणि पर्यटकांसाठी मोठं असं ‘आनंद सागर’ उद्यान आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे उद्यान भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. दरम्यान हे उद्यान लवकरच सुरू होणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे.

Shegaon : संत गजानन महाराजांच्या भक्तांची उत्सुकता संपणार, ‘आनंद सागर’ उद्यान भाविकांसाठी खुलं होणार

त्यामुळे ‘आनंद सागर’ उद्यानाला भेट देण्याची संत गजानन महाराजांच्या भक्तांची उत्सुकता संपणार आहे. कारण ‘आनंद सागर’ उद्यान भाविकांसाठी खुलं होणार आहे. दरम्यान यामध्ये भक्त आणि अध्यात्मिक अनुभूती घेणाऱ्यांसाठई एक आनंदाची बातमी समेर आली आहे ती म्हणजे आज पासून ‘आनंद सागर’ उद्यानातील फक्त अध्यात्मिक केंद्र खुलं करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर आता हळूहळू टप्याटप्याने येत्या तीन ते चार महिन्यात हे उद्यान आणि यातील सुविधा सुरू होणार असल्याचं सागण्याच येत आहे. त्यामुळे जगभरातून येणाऱ्या पर्यटक आणि भक्तांमध्ये आनंदाचा वातावरण पाहायला मिळत आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडीयाद्वारे हे उद्यान खुले करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube