Uddhav Thackeray On Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज महायुतीचे (Mahayuti) उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान देत तुम्ही राम मंदिर, सीएएवर बोलूवून दाखवा असा आव्हान दिला होता तर आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवलीत जाहीर सभा घेत अमित शहा तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही जनतेच्या प्रश्नांवर बोला असा प्रतिआव्हान केला आहे.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज रत्नागिरीमध्ये अमित शहा यांनी शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत मला एक आव्हान देऊन गेले की, तुमच्यात हिम्मत असेल तर याच्यावर बोला त्याच्यावर बोला मात्र अमित शहा तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही जनतेच्या प्रश्नांवर बोला असा प्रतिआव्हान ठाकरेंनी अमित शहा यांना केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राम मंदिर बांधलं हे चांगलंच केलं. पण तुमची हिंमत नव्हती, तेव्हा शिवसेना पुढे होती. तुम्ही गेल्या 10 वर्षापासून सत्तेत आहे तरीही तुम्ही काय करू शकले नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना टोला लावला. अमित शाह तुम्ही माझ्या वडिलांचं नाव घेऊन मत मागू नका तुम्ही आमचे माणसे फोडले, तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव पुढे ठेवून मत मागा असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिरसाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. मी राम मंदिरात जाऊन आलो मात्र तुम्ही भवानी मंदिरात का गेले नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
अमित शहा आणि हिम्मत विरुद्ध शब्द आहे मात्र तरीही देखील तुमच्यात हिम्मत असेल तर उद्या कोंकणात येऊन घोषणा करा बारसुला रिफायनरी होणार नाही असं आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना दिला.
राज्यात 202 साखर कारखाने होते मात्र आज 101 का राहिली ? उत्तर द्या, अमित शहांचा शरद पवारांना सवाल
तर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले, आज सकाळी मला कोणी तरी धमकी दिली की कोण इथं येतो बघतो, मी येऊन उभा आहे, तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो अशा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना दिला. तुला लाज वाटली पाहिजे यापूर्वी देखील इकडे येऊन तुला आडवा केला त्यानंतर माझ्या घराकडे तुला साफ केला, लाज नाही लज्जा नाही फक्त बडबडतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर टीका केली.