Download App

‘एकनाथ शिंदे बेकायदा मुख्यमंत्री’; दिल्ली दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंनी धू-धू धुतलं…

Udhav Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे बेकायदा मुख्यमंत्री असून हे आमचं नाहीतर न्यायालयाचं म्हणणं असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धू-धू धुतल्याचं पाहायला मिळालं आहे. जळगावमध्ये आयोजित वचनपूर्ती सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

‘भावी मुख्यमंत्री, जादूई आकडा अन् वेळेचं गणित’ गुगली प्रश्नांना अजितदादांचं ‘सेफ’ उत्तर

उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीत G20 परिषद सुरु आहे, विदेशातून अनेक पाहुणे या परिषदेसाठी भारतात दाखल झाले आहेत, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही परिषदेला गेले आहेत, एकतर हे बेकायदा मुख्यमंत्री आहेत, हे आमचं नाहीतर न्यायालयाचं म्हणणं असून गद्दार आहेत ते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिषदेला जाऊन काय बोलणार? कोणाशी बोलणार बायडनशी बोलणार आहेत काय? असा खडा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

‘करा किंवा मरा’ सामन्यात बांगलादेशसमोर माफक आव्हान, सदिरा समरविक्रमाची झंझावाती खेळी

तसेच बायडन यांच्याशी की ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी बोलणार आहेत, ते कोणत्या भाषेत बोलले आणि तुम्ही त्यांच्याशी काय बोलले ते सांगा? दोघांमधलं संभाषण एकमेकांना कळलं की नाही, हे ही सांगा? या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

नगरमध्ये राजकीय वातावरण तापलं! बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकरांच्या उपस्थितीत ‘जनसंवाद यात्रा’

दरम्यान, आपल्या गद्दार मुख्यमंत्र्यांना बाकी काही नाही फक्त फोटो आला पाहिजे, एवढीचं चंपकगिरी करायची असून सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरु असून त्यांना भेटायचं सोडून मुख्यमंत्री दिल्लीला जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=7DOsNyIkNfE

भाजपवर हल्लाबोल :
तुम्ही मतदान केलं. त्यानंतर या लोकांच्या डोक्यात हवा गेली. त्यांचे आता फुगे झाले आहेत. या फुग्यांना टाचणी लावण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. ही तुम्हीच मोठी केलेली माणसं आहेत. मी आज सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जातं. पटेलांना लोहपुरुष म्हटलं जातं. भाजप आणि आरएसएसने एकही आदर्श काम केलं नाही. फक्त चोरी केली. आता माझे वडील चोरायला निघाले आहेत. कर्तुत्व काहीच नाही. पटेलांचा पुतळा कितीही मोठा बांधा. तुम्ही कसले पोलादी पुरुष. लुटालूट करायची आदर्श म्हणून मिरवायचं हेच यांचे चाळे आहेत,

Tags

follow us