‘देश के लिए मन की अन् गुजरात के लिए धन की बात’; ठाकरी बाणा थेट मोदींवरच कडाडला

Udhav Thackeray On Narendra Modi : देश के लिए मन की अन् गुजरात के लिए धन की बात म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) कडाडले आहेत. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. नाशिकच्य हुतात्मा मैदानात आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह […]

Ram Mandir : अयोध्येतील नव्या राजकीय मोदी रामायणाचा श्रीरामांशी संबंध नाही; ठाकरे गटाचा टोला

Ram Mandir

Udhav Thackeray On Narendra Modi : देश के लिए मन की अन् गुजरात के लिए धन की बात म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) कडाडले आहेत. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. नाशिकच्य हुतात्मा मैदानात आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लबोल चढवला आहे.

NCP शी युती नाही म्हणतात अन् पहाटे, दुपारी दोनवेळा लव्ह मॅरेज; ‘देवा’भाऊ म्हणत अंधारेंनी जुनं उकरुन काढलं

उद्धव ठाकरे म्हणाले, आता सहन होत नाही म्हणून सांगितलं पाहिजे, तोडून मोडून काढलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र वाऱ्या चांगल्याच वाढल्या आहेत. कधी काळाराम मंदिर, सोलापुर तर आता पोहरादेवी मंदिरात येत असल्याचं सांगितलं जातं. मोदी पाहुन घ्या महाराष्ट्र ..हाच महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Video : अयोध्येत भक्तांच्या गर्दीपुढे सुरक्षेचे तीन तेरा; अलोट गर्दी नियंत्रणासाठी नियमावली जारी

ज्यावेळी महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले नाहीत. आता मतांसाठी येत आहेत. मोदी कधी मणिपूरला नाही गेले कारण तिथं दोनच लोकसभेच्या जागा आहेत. पण राज्यात 48 आहेत म्हणून ते इकडे येतात. निवडणुका आल्यावरच त्यांना महाराष्ट्र आठवतोयं. जेव्हा तोक्ते चक्रीवादळाच्या संकटात राज्य होरपळतं तेव्हा
त्यांची महाराष्ट्रात येण्याची दानत नव्हती. तोक्ते वादळात महाराष्ट्र होरपळत होता तेव्हा गुजरातला मोदींनी हजारो कोटी रुपये दिले पण महाराष्ट्राला ठेंगा दिला होता. त्यामुळेच देश के लिए मन की बात अन् गुजरात के लिए धन की बात असल्याचं म्हणत मोदींनी हल्लाबोल चढवला आहे.

रोहित शेट्टीने चेन्नई एक्सप्रेसबद्दल शाहरुख खानचा ‘तो’ किस्सा सांगितला; म्हणाला ‘लुंगी डान्स’ हे गाणे…’

तसेच गुजरात आमचाही. इकडेही गुजराती लोकं राहतात. संपूर्ण देशभरात गुजरातचे लोकं रहिवास करतात. पण मोदी आता हिंदुंमध्ये जे विष पेरतात ते घातक आहे. १९९२-93 साली ज्या दंगली पेटल्या होत्या त्यावेळी आम्ही कधीच मराठी गुजराती असा भेदभाव केला नव्हता. आता माझ्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. कुणीतरी घरंदाज माणसाने केला तर त्याला उत्तर देणं आवडेल मला पण हा महाराष्ट्रच माझं कुटुंब आहे ही माझी घराणेशाही असल्याचं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

Exit mobile version