Udhav Thackeray On Pm Narnedra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Pm Narendra Modi) कधीपासून मंगळसुत्राचं महत्व कळायला लागलं? असा उपरोधिक सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी थेट केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदु महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्राबाबत विधान केलं होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी सवाल केला आहे. ते नांदेडमधील आयोजित सभेत बोलत होते.
“पवार साहेब तुमचं आडनाव फडणवीस असतं तर तुृम्हालाही कुणी हुंगलं नसतं” सदाभाऊंचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे म्हणाले, देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर तुमच्या वाट्याची संपत्ती, हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र जास्त मुलं असणाऱ्यांना दिली जातील, असं विधान मोदींनी केलंयं. पण मोदी यांनी मंगळसुत्राचं महत्व कधीपासून कळायला लागलं? मागील दहा वर्षांत ते विकास, बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यांवर बोलत नाहीत. ते बोलतात तर कोण मांस खातंय, कोण मच्छी खातं, कोणाला किती मुलं? या विषयांवरच ते बोलत असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मनोज बाजपेयींच्या वाढदिवशी चाहत्यांना निर्मात्यांकडून खास भेट, शेअर केला ‘बाग का करेजा’चा टीझर
मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मोदींचा फोटो लावून निवडून आले पण या निवडणुकीत गद्दार सनेच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी फक्त मोदींचाच फोटो का वापरत नाहीत? त्याचं कारण म्हणजे मोदींचं नाव महाराष्ट्रात चालत नाही. त्यांचं नाणे आता महाराष्ट्रात चालेना अशी सडकून टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
फडणवीसांनी हनुमंताकडं काय मागितलं?, म्हणाले आमच्यासाठी बुद्धी तर विरोधकांसाठी…
तसेच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्राशी काडीचाही संबंध नाही. तरीही अमित शाह हे महाराष्ट्रात येऊन फणा काढतात पण ते मणिपूरमध्ये जाऊन शेपूट घालत असल्याचं म्हणत अमित शाहा यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले होते मोदी?
देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर तुमच्या वाट्याची संपत्ती, हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रं जास्त मुलं असणाऱ्यांना दिली जातील, असं मोदी म्हणाले होते.
दरम्यान, मोदीजी कायमच मेरा परिवार म्हणत असतात. प्रत्यक्षात मोदींनी किती शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली आहे, परिवारातले लोकं बेरोजगार आहेत, भीक मागताहेत नुसतंच मेरा परिवार बोलून फायदा काय? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
