मनोज बाजपेयींच्या वाढदिवशी चाहत्यांना निर्मात्यांकडून खास भेट, शेअर केला ‘बाग का करेजा’चा टीझर

मनोज बाजपेयींच्या वाढदिवशी चाहत्यांना निर्मात्यांकडून खास भेट, शेअर केला ‘बाग का करेजा’चा टीझर

Bagh Ka Kareja Teaser: बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयींचा (Manoj Bajpayee) काल 55 वा वाढदिवस साजरा पार पडला. यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या आगामी ‘भैय्या जी’ (Bhaiyya Ji Movie) या चित्रपटातील ‘बाग का करेजा’ (Bagh Ka Kareja Teaser) या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज केला असून, हे गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केले आहे.

यापूर्वी बाजपेयींचा कोर्टरूम ड्रामा ‘एक बंदा काफी है’ (Ek Banda Kafi Hai) दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. मनोज बाजपेयी यांचा आगामी चित्रपट ‘भैय्या जी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याआधीही प्रेक्षकांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी निर्माते चित्रपटातील काही अपडेट्स शेअर करत आहेत.

डायनॅमिक फिल्ममेकर येणार एकत्र; मोझेझ अन् गुनीत करणार खास प्रोजेक्ट

मनोज बाजपेयी यांचा वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाच्या ‘बाघ का करेजा’ या नवीन गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. हे गाणे सर्वांच्या आवडत्या मनोज तिवारीने गायले आहे आणि संगीतबद्ध केले आहे. याचे गीत डॉ सागर यांनी लिहिले असून संगीत आदित्य देव यांनी दिले आहे.

आता ”बाघ का करेजा’ चा टीझर रिलीज झाला आहे, त्याचे संपूर्ण व्हिडिओ गाणे निर्माते उद्या म्हणजेच 24 एप्रिल रोजी रिलीज करणार आहेत. या गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी ‘भैय्या जी’ चा टीझर रिलीज झाला होता जो प्रेक्षकांनाही खूप आवडला होता. मनोजने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता आणि कॅप्शन लिहिले आहे की, ‘आणखी विनंती नाही, नरसंहार होईल! भावाची पहिली झलक आली आहे. 24 मे पासून जवळच्या चित्रपटगृहांमध्ये ‘भैय्या जी’ लवकरच पाहा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज