Download App

मी असे किळसवाणे पाहत नाही; सोमय्यांच्या ‘त्या’ व्हिडीओवर ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया


Udhdhav Thackeray On Kirit Somayya :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले होते. विधान परिषदेत नियमानुसार हजेरी लावण्यासाठी ते आले होते. उद्धव ठाकरे विधीमंडळ परिसरात आले तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात ते काही वेळ बसले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना भाजप  नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ क्लिपविषयी विचारण्यात आले.

यावर उद्धव ठाकरेंनी मी असे किळसवाणे व्हिडीओ पाहत नाही असे उत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी असे किळसवाणे आणि बीभत्स व्हिडीओ कधीही बघत नाही.परंतु त्यावर काल जनतेने आणि खास करुन राज्यातल्या माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या भावनांची कदर सरकारने केली पाहिजे.”

CM शिंदे साईड लाईन! भाजप-राष्ट्रवादीची रणनीती; PM मोदींची अजितदादा, पटेलांशी बंद दाराआड चर्चा

काय आहे प्रकरण?

भाजप नेते किरीट सोमय्या यांची एक कथित व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. एक वृत्त वाहिनीने यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर मोठ्या प्रमाणावर गदारोळ उठला आहे. विधान परिषदेमध्ये काल (18 जुलै)  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. त्यांनी एक पेनड्राइव्ह विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

कृषी कर्जांचे वाटप झालेच नाही, सरकार फक्त जखमेवर मीठ चोळते; पटोलेंची घणाघाती टीका

यानंतर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. फडणवीस म्हणाले की, राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही.

Tags

follow us