CM शिंदे साईड लाईन! भाजप-राष्ट्रवादीची रणनीती; PM मोदींची अजितदादा, पटेलांशी बंद दाराआड चर्चा

CM शिंदे साईड लाईन! भाजप-राष्ट्रवादीची रणनीती; PM मोदींची अजितदादा, पटेलांशी बंद दाराआड चर्चा

दिल्ली : भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची काल (18 जुलै) बैठक पार पडली. भाजपचे जवळपास 38 मित्रपक्ष बैठकीत सहभागे झाले होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र या बैठकीनंतर दिल्लीत अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत खास बैठक पार पडली असल्याची माहिती आहे. (After the NDA meeting, Prime Minister Narendra Modi held a special meeting with Ajit Pawar and Praful Patel in Delhi)

बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल मागेच थांबले. त्यानंतर या दोघांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी दीर्घ गोपनीय बैठक पार पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाच्याबाबतीत मोठी रणनीती ठरली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बारामती जिंकण्याचा भाजपचा चंग! पवारांच्या बालेकिल्ल्यात नेमला ‘खास’ शिलेदार

बैठकीतही अजितदादांना मानाचे स्थान :

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नव्याने आलेल्या अजित पवार यांना महाराष्ट्रात मानाचे स्थान देण्यात येत आहे. त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सरकारमधील महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. स्वतः अजित पवार यांच्याकडे अर्थखातं सोपवतं राज्याच्या तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. तर कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालकल्याण अशी महत्वाची खातीही देण्यात आली आहेत.

त्यापाठोपाठ केंद्रामध्ये भाजपकडून मानाचे स्थान देण्यात आल्याचे कालच्या एनडीए बैठकीतून दिसून आले. एनडीएच्या निमंत्रण पत्रिकेत तिसऱ्याच नंबरला राष्ट्रवादीचे नाव होते. या बैठकीदरम्यान सामूहिक फोटोशूटवेळी अजित पवार यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. दिल्लीतील हॉटेल अशोका येथे बैठक सुरु होताच अजित पवार यांना आसनव्यवस्थेमध्ये मानचे स्थान देण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आसन करण्यात आले होते.

आशीर्वाद नाही तर, दिल्ली भेटीचे निमंत्रण; PM मोदींचा निरोप घेऊन अजितदादा गेले होते पवारांच्या भेटीला

त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवत अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत खास बैठक पार पडली असल्याची माहिती आहे. यातून अजित पवार यांचे भाजपसाठी असलेलं महत्व अधोरेखित होतं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube