Download App

उज्ज्वल निकम आता राज्यसभेत; संतोष देशमुख हत्याकांड खटला सोडणार ?

Ujjwal Nikam now in Rajya Sabha: निकम हे राज्यात गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील आहेत.

  • Written By: Last Updated:

Ujjwal Nikam now in Rajya Sabha : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam). त्यांचे नाव घेतले तर हायप्रोफाइल केसेस डोळ्यासमोर येतात. 1993 चा मुंबई बॉम्ब ब्लॉस्टमधील मास्टरमाइंड आरोपी असोत की मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब. यांना फासावर लटकविण्यात मोठे योगदान आहे ते उज्ज्वल निकम यांचे. निकम यांनी केस घेतली म्हणजे निर्दयी आरोपींना शिक्षा होणाराच हे ठरलेले. त्यांनी तीस वर्षांच्या कारकीर्दीत 37 जणांचा फाशीच्या, तर 628 जणांचा जन्मठेपेच्या शिक्षेचे निकाल घेतलेत. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम हे आता राज्यसभेत दिसणार (Rajya Sabha) आहे. निकम हे राज्यात गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील आहेत. त्यामुळे या केसचे आता काय होणार आहे हा प्रश्न आहे. याबाबत जाणून घेऊया…
—————–


मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, वाचा काय अन् कसं घडलं?

1993 बॉम्बस्फोट खटल्यामुळे निकमांचे नाव देशात
उज्ज्वल निकम हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील. त्यांचे वकिलीचे शिक्षण जळगावमध्ये झालेले. जळगावमधूनच वकिली सुरू केलेली. जळगाव कोर्टात ते सरकारी वकील होते. पण 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यानंतर उज्ज्वल निकम यांचे नाव हे देशाला माहीत झाले. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. राज्यात, देशात नावाजलेले वकील असताना या खटल्यात उज्ज्वल निकम हे सरकारी वकील झाले. त्यामुळे त्यांचे नाव देशभर चर्चेत आले. जळगाववरून मुंबईत आलेल्या निकमांनी मुंबई हल्ल्यातील अनेक आरोपींना फाशीच्या फंदावर नेले होते. त्यातील एक नाव म्हणजे याकुब मेमन. (Ujjwal Nikam now in Rajya Sabha)

——————

अनेक खटले लढले अन् आरोपींना शिक्षा
गायक गुलशन कुमार मर्डर केस, खैरलांजी येथील हत्याकांड, अंजनाबाई गावित हत्याकांड, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, शक्ती मिल बलात्कार केस, कोपर्डी बलात्कार व हत्याप्रकरण असे महत्वाचे खटले ते सरकारी वकील म्हणून लढले आहेत. याच महत्वपूर्ण कामगिरीबद्दल 2016 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

Bihar : मतदार यांद्यामध्ये मोठा घोळ, व्होटर लिस्टमध्ये नेपाळ, बांगलादेश अन् म्यानमारच्या नागरिकांची नावे

———————
राजकारणात एन्ट्री पण अपयश…
विधानपरिषद किंवा राज्यसभेसाठी उज्ज्वल निकम यांचे नाव नेहमी चर्चेत येत होते. परंतु देशात गाजणारे खटले लढणारे अॅड. उज्ज्वल निकम हे 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून मध्य-मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढले. परंतु काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. पराभूत झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेले खटले त्यांनी पुढे चालविले. मध्यंतरी राज्यभर गाजलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली. या खटल्यात वाल्मिक कराड हा आरोपी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे हा खटला संवेदनशील आहे. परंतु आता निकम यांची राष्ट्रपतींनी राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती केलीय. त्यामुळे संतोष हत्याकांड खटला ते लढणार का असा प्रश्न उपस्थित होतायत.

मी विशेष कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करून निर्णय घेणार: उज्ज्वल निकम
संतोष देशमुख प्रकरणावर विशेष सरकारी वकील म्हणून काम करु शकतो की नाही, यावर अभ्यास करणार आहे. मी विशेष कायदेतज्ज्ञांसोबत बोलणार असं, उज्ज्वल निकम यांचे म्हणणं आहे. विधितज्ज्ञ कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, अरुण जेटली हे राज्यसभेवर होते. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात खटले लढले आहेत. दोन्ही भाग वेगवेगळे आहेत. त्यामुळे कायदेशीरित्या संतोष देशमुख हत्याकांड खटला लढण्यात अॅड. उज्ज्वल निकम यांनी अडचण येऊ शकत नाही, असे मत पुण्यातील वरिष्ठ वकील व सरकारी वकील राहिलेले अॅड. बाळासाहेब खोपडे यांचे आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी अनेक खटले लढताना युक्तिवादात आरोपींच्या वकिलांना धोबीपछाड दिलेली आहे. आता ते राज्यसभेतही कायद्याच्या ज्ञानाच्या जोरावर विरोधकांचे नामोहरण करतील. तसेच कायदे करताना त्यांचे मत ही महत्त्वाचे राहिल.

follow us