Download App

शिवतारेंचं ऐकूण घ्यायला आम्ही एवढे लाचार नाही; अजितदादा गटाचा युतीतून बाहेर पडण्याचा इशारा

  • Written By: Last Updated:

Umesh Patil On Vijay Shivtare : शिवसेना नेते विजय शिवतार (Vijay Shivtare) यांनी काल (24 मार्च) बारामती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची तुलना विंचवाशी केली. त्यांच्या या टीकेला आता अजित पवार गटाचे नेते उमेश पाटी (Umesh Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

सातारा लोकसभेच्या रिंगणात अभिजित बिचकुलेंचीही उडी! 

शिवतारेंच्या या वक्तव्यानंतर उमेश पाटील यांनी थेट महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. विजय शिवतारे यांना निवडणूक लढवायची असेल तर खुशाल यांनी निवडणूक लढवावी, असा निर्वाणीचा इशारा पाटील यांनी दिला.

Team India Australia Tour : टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाच्या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा 

उमेश पाटील म्हणाले, विजय शिवतारे यांना निवडणूक लढवायची असेल तर आमचा विरोध करण्याचे कारण नाही. लोकशाहीत प्रत्येकजण निवडणूक लढवू शकतो. कारण प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र, आमचे नेते अजित पवार यांना विंचू म्हणणे, अजित पवारांची तुलना विंचूवाशी करणे, एवढ्या खालच्या पातळीवर बोलणे, चपलेने मारण्याची भाषा करणे, विंचू शब्दाचा प्रयोग करणे, एवढं ऐकूण घेण्यापर्यंत आम्ही लाचार झालेलो नाहीत. शिवतारे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ते महायुतीमधील घटक पक्षाचे नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवतारे भेटले, मुख्यमंत्र्यांनी त्यांना समजावून सांगितले. मात्र तरीही विजय शिवतारे थांबायला तयार नाहीत.

पाटील म्हणाले, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, असे म्हणायचे. दुसरीकडे, महायुतीमधील एक घटक महायुतीतीलच एका नेत्याला अडचण निर्माण करण्याचे काम करत आहे. आमच्या नेत्यावर या स्थरावर जाऊन टीका करत असेल तर निश्चितपणे महायुतीत राहायचे की नाही? हा विचार आम्हाला करावा लागेल, आम्ही लाचार झालो नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबाबत खालच्या पातळीवर कोणी बोलत असेल तर ही बाब गंभीर आहे, असं पाटील म्हणाले.

विजय शिवतारे काय म्हणाले ?

या विंचवाने अनेकांना दंश केला आहे आणि आता तो महादेवाच्या पिंडीवर मोदींकडे जाऊन बसला. अडचण अशी झाली की चप्पल मारावी तर महादेवालाही लागतेय आणि विंचवालाही मारता येत नाही. ही लोकांची भावना आहे. विंचूच्या रुपात असलेल्या फक्त अजित पवारांनाच नाहीतर या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा बिमोड करायला पाहिजे, असं शिवतारे म्हणाले होते.

follow us