Vadgaon Sheri MVA Candidate Bapusaheb Pathare : आज देशभरामध्ये छठ पुजा (Chhath Puja) मोठ्या उत्सावात साजरी केली जात आहे. पुण्यात देखील छठ पुजेच्या निमित्ताने नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. हेच औचित्य साधून महाविकास आघाडीचे (MVA) वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी नागरिकांना छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बापूसाहेब पठारे यांनी पु्ण्यातील अनेक ठिकाणी भेटी देखील दिल्या आहेत. नागरिकांसाठी निरोगी आणि सदृढ आरोग्याची प्रार्थना केली आहे.
महाविकास आघाडीचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी ‘छठ पूजे’च्या मंगलमय निमित्ताने विमाननगर तसेच लोहगाव या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. त्यांनी कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांना सूर्य उपासनेचे महापर्व म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या छठ पूजेच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. बापूसाहेब पठारे यांनी सर्वांच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी तसेच सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना केली.
कॉंग्रेसच्या शिलेदारांसाठी प्रियांका गांधी मैदानात; गडचिरोलीत ‘या’ तारखेला होणार भव्य रोड शो
यावेळी समवेत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक महादेव पठारे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व धर्मियांना आपले सण सुविधायुक्त आणी एकोप्याने साजरे करता यावेत, प्रगतीच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी कार्यरत राहीन, अशा भावना बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केल्या. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
Puja Khedkar Case: पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; अटक होणार की पुन्हा संरक्षण मिळणार?
सप्टेंबर महिन्यात बापूसाहेब पठारे यांनी भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांनी ‘तुतारीला मतदान करा’ असं आवाहन केलंय. सध्या ते महाविकास आघाडीच्या तिकीटावर मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून अजित पवार गटाचे उमेदवार सुनिल टिंगरे यांचं बापूसाहेब पठारेंना कडवं आव्हान आहे. टिंगरे विद्यमान आमदार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे प्रचार सभा घेत आहेत. तसेच नागरिकांच्या भेटीगाठी देखील घेत आहेत.