Download App

आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार, लोकसभेचं गणित बिघडणार?

Prakash Ambedkar on India Alliance : भाजप विरोधात देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची (India Alliance) स्थापना केली आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना केलेली आहे. या आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) समावेशाची चर्चा सुरु आहे. मात्र काहीच ठरत नाही असं गृहीत धरत आम्ही 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागलो आहोत, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जाहीर केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार आहे. ते म्हणाले की लोकसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात अशी परिस्थिती आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाही. महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्यानंतर ठाकरे गट आणि वंचितच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल. मात्र काहीच होत नाही असं गृहीत धरत आम्ही 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याच्या तयारीला लागलो आहेत. लवकरच बीड आणि सटाणा येथे सभा घेणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

उद्धव ठाकरे आणि आमचा एकमेकांवर भरोसा आहे. काँग्रेसवाले जागा वाटपाची चर्चा करत नाहीत. राष्ट्रवादीकडून आडकाठी केली जात आहे. एकत्रित फॉर्म्युला ठरवण्यासाठी वेळ पाहिजे. पण ते वेळ घेत नाहीत. एकत्र येत नाहीत, असं आंबेडकर म्हणाले.

‘राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादाच, कारवाईची चिंता नाही’; अनिल पाटलांनी शरद पवार गटाला ठणकावलं…

आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत. महाविकास आघाडीशी आम्ही आजही चर्चा करायला तयार आहोत. पण म्हणून आमची तयारी करु नये असं होत नाही, असं सांगतानाच यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Ghungru Movie: गौतमी पाटीलच्या सिनेमाची पहिली झलक पाहिलीत का? ‘या’ दिवशी होणार रिलीज

वंचितने 1 सप्टेंबरला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले होते. परंतु काँग्रेसकडून अद्याप यावर कोणतेही ठोस उत्तर आले नाही. त्यामुळे वंचितसोबत काँग्रेसला आघाडी करण्यात रस आहे का? असा प्रश्न करत खर्गेंना पाठवलेल्या पत्राची आठवण करुन दिली आहे. त्याचसोबत काँग्रेसने 7 दिवसांत उत्तर द्यावे अन्यथा लोकसभेतील सर्व 48 जागांवर निवडणूक लढवू असं त्यांनी म्हटलं आहे.

follow us