Download App

मोठी बातमी : वंचित महाविकास आघाडीत; तिघांच्या सहीचे पत्र पण आंबेडकरांचा निर्णय काय ?

  • Written By: Last Updated:

Mahavikas Agadi Letter to Prakash Ambedkar मुंबईः प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Agadi) घेण्यात आले आहे. याबाबत महाविकास आघाडीने अधिकृतपणे आज पत्र काढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हा निर्णय घेतला आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांच्याबरोबर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर वंचितचा महाविकास आघाडीत समावेश केल्याचे पत्र प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले आहे.

देशाच्या संसदेतही घुमणार “मोदी-मोदी अन् जय श्रीराम”चे नारे; शिवसेना आणणार प्रस्ताव

काही दिवसांपासून वंचितला महाविकास आघाडीत घेण्याबाबत चर्चा सुरू होती. परंतु त्यातून अनेकदा वादही उफाळून आले होते. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली होती.

भाजप बहुमताचा आसपासही नाही… तरी तावडेंनी सगल तिसऱ्या वर्षी चंदीगडचे मैदान कसे मारले?

माझ्या निर्णय दिल्लीतील काँग्रेसचे नेते, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे घेतील, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले होते. परंतु महाविकास आघाडीतील राज्यातील नेत्यांनीच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हा निर्णय मान्य करतात का? यावर अद्याप त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही.

पत्रात नेमकी काय ?

महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना वंचितला महाविकास आघाडीत समावून घेण्याचे पत्र देण्यात आले आहे. या पत्रात देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले आहे. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जात असल्याचा आरोपही महाविकास आघाडीने केला आहे. 2024 साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला. तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी लोकांना शंका वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. हे आपण जाणताच. आपण स्वत: हुकूमशाहीविरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत, असे पत्रात म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे. आज मंगळवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला वंचित बहुन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले आहे. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे, असे पत्रात म्हटले आहे.

follow us