VBA On Sanjay Raut : गद्दारांच्या पक्षाला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) खरी शिवसेना (Shiv Sena) म्हणत असतील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार रामदास आठवले आहेत, असं मानलं पाहिजे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला होता. त्यावर आता वंचित बहूजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) जोरदार प्रत्युत्तर दिलं. राऊत हे प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्यानं ते काहीही बरळतात,असा टोला वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी लगावला.
Ground Zero : तीन पराभवांचा वचपा बाकी… ‘शशिकांत शिंदे’ उसळी मारणार?
ठाकूर म्हणाल्या, संजय राऊत यांना खऱ्या-खोट्याचं भान राहिलेलं नाही. वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करण्यासाठी ते तोल गेल्याप्रमाणे बरळत असतात. राऊत यांच्यामुळे अख्खा पक्ष सोडून गेला. महाराष्ट्रात राऊतांना कुणी प्रगल्भ राजकारणी मानत नाही. संजय राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका त्यांनी केली.
पुढं त्या म्हणाल्या, राऊत जी भूमिका मांडतात, ती उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाविकास आघाडीची समजायची का? ज्या वंचित बहुजन आघाडीला सुरूवातीच्या बैटकीतही बोलावलं नाही, त्यांना आम्ही 7 जागा देऊ केल्या, अशी थाप राऊतांनी मारली, असा आरोप त्यांनी केला.
नवाब मलिकांची अजित पवारांना साथ? एक्सवर पोस्ट करत दिले संकेत
तसेच ज्या लोकाना देशद्रोही, धर्मांध म्हणत आहात, त्यांना वाढवण्याचं पाप तुमचंच आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोध्रा हत्याकांडात नरेंद्र मोदींना पाठीशी घालण्याचं काम त्यांनीच केलं हे ते विसरले का? असा टोला ठाकूर यांनी लगालला.
राऊत काय म्हणाले होते?
ठाकरेंच्या शिवसेनेला आपण खरी शिवसेना मानत नाही. कारण, लोकसभेचा निकाल शिंदे यांच्या बाजूने लागला आहे, असं प्रकाश आंबेडकर आंबेडकर म्हणाले होते. त्यावर बोलतांना राऊत म्हणाले की, निष्ठावंत शिवसैनिकांसाठी मातेसमान असलेल्या शिवसेनेला फोडून गद्दारांची सेना स्थापन करणाऱ्या शिंदे सेना हीच खरी शिवसेना असल्याचे आंबेडकर मानत असतील, तर रामदास आठवले, प्राध्यापक जगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई हेच बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुढे नेण्याचं काम करत आहे, असं म्हटल्यास वावंग ठरू नये, असं राऊत म्हणाले होते.