प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
vanchit bahujan aghadi alliance with congress bmc election ?: महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस राहिलेत. तरी देखील राज्यातील महायुती व महाविकास आघाडी निश्चित झालेली नाही. उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे युती आणि आघाडीमध्ये काही महानगरपालिकेत संभ्रम आहे. असे असताना मुंबईत (BMC)मात्र वंचित बहुजन आघाडी (vanchit bahujan aghadi) आणि काँग्रेसमध्ये (congress) आघाडी होईल, असे निश्चित मानले जात आहे. परंतु जागा वाटपांचा तेढ अजूनही सुटलेला नाही. ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा झालीय. तसेच वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते. ज्या काँग्रेसचे नेते वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवत होते. तीच काँग्रेस त्यांच्याबरोबर आघाडी करेल. त्यामुळे या आघाडीचे बळ वाढणार आहे. तेच वंचितवरील भाजपची ‘बी टीम’ म्हणून लागलेला डाग काँग्रेसच पुसणार आहे. त्यातून भाजप काँग्रेसवर शरसंधान साधणार हे नक्की.
काँग्रेसच्या आशा पल्लवीत
लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीतील चौथा भिडू म्हणून वंचितशी बोलणी सुरु होती. मात्र त्यांची बोलणी फिसकटली. महाविकास आघाडीकडून प्रचार रॅली सभा आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी भाजपाची बी टीम असल्याचा आरोप वारंवार काँग्रेसकडून होऊ लागला. त्याला वंचितकडून जोरदार प्रत्युत्तर देखील देण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर रखडलेल्या राज्यातील नगरपरिषदा आणि नगर पंचायत निवडणुका काही दिवसापूर्वी संपन्न झाल्या. यात काँग्रेस पक्षाला विदर्भात चांगल यश प्राप्त झाले. संपूर्ण राज्यात काँग्रेसच्या म्हणण्यानुसार 41 नगराध्यक्ष त्यांचे झाले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार काल पक्षाच्या वतीने मुंबईत करण्यात आला. यावेळी काँग्रेसची ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की काँग्रेस संख्येने जरी कमी असला तरी महाराष्ट्रात सर्वात मोठा विरोधी पक्ष नेता म्हणून आपलं असत निर्माण करत आहे. राज्यातील राजकारण बदलण्यास सुरवात झाली आहे.
महापालिकेत विरोधी नेता पदासाठी खेळी?
गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजपाची सत्ता होती. महापौर शिवसेनेचा होता तर विरोधी पक्षनेते पद काँग्रेस पक्षाकडे होते. मात्र आता गेल्या तीन वर्षांपासून समीकरणे बदलले असून दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी पक्ष झाले आहेत. त्यामुळे शिंदे शिवसेना भाजपाला महापालिकेची सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे त्यांनी कंबर कसली आहे. मुंबई महापालिका 2017 निवडणुकीत निवडून आलेले बहुतेक नगरसेवकांना भाजप आणि शिंदे शिवसेनेने आपल्याकडे वळण्यात यश आहे. मनसे ठाकरे सेनेची युती झाली आहे. काँग्रेस पक्षाला समविचारी पक्ष म्हणून वंचितला सोबत घेतल्याशिवाय गत्यानंतर नसल्याचे बोलले जात आहे.जरी बहुमत मिळाले नाही तर विरोधी पक्षासाठी लागणारे संख्याबळ मिळाले पाहिजे आशा प्रकारचे ध्येय काँग्रेसने ठरवले असल्याचे सांगितले जात आहे. याच भूमिकेसाठी काँग्रेसने वंचितला सोबत घेतल्याचं चर्चा रंगू लागल्या आहे.
‘मनरेगा बचाव’ काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार, अध्यक्ष खरगेंनी केली घोषणा
वंचितला हव्या ‘त्या’ दोन जागा
मुंबई महापालिका आघाडीबाबत काँग्रेसकडून वारंवार सांगितले जात आहे की आमची वंचित सोबत बोलणे सुरू असून लवकरच याबद्दल घोषणा केली जाईल. मात्र वंचितकडून ठोस अद्याप निर्णय आलेला नाही. परंतु वंचितचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसबरोबर जाण्याबाबत सकारात्मक आहे. फक्त दोन जागांसाठी ही आघाडी अडली आहे. काँग्रेस पक्षातील एका नेत्याच्या नातेवाईकासाठी दोन जागा जागा हव्या आहेत. त्याच जागांवर घोडं अडलं आहे. काँग्रेस पक्षाने लवकरात लवकर निर्णय घेऊन पक्षाच्या नेत्याचा विचार न करता सामान्य कार्यकर्त्याचा विचार करावा असं आवाहन वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. सदर दोन जागांविषयी माहिती देण्यास त्यांनी यावेळी नकार दिला.
पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सुरू असतानाच नाराजीनाट्य; शहराध्यक्षांना कार्यकर्त्यांसमोरच अश्रू अनावर
वंचित आता भाजपची बी टीम नाही
वारंवार महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून वंचितला भाजपची बी टीम असल्याचे हिणवत गेले. पालिका निवडणुका डोळ्यासमोर पाहून आता काँग्रेसला वंचित भाजपाची बी टीम नसल्याच साक्षात्कार झाला आहे. याविषयी काँग्रेस – वंचित बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पालिका निवडणुकीत काँग्रेस वंचित युती झाल्यास भाजपा -शिंदे शिवसेना बी टीम म्हणून कोणाला टार्गेट करतील हे पाहणे महत्वाचे असेल. आशिया खंडातील आर्थिक दृष्ट्या सर्वात मोठी महापालिकेवर सत्ता कायम राखण्यासाठी एका बाजूला भाजपा शिंदे शिवसेना तर दुसऱ्या बाजूला मनसे ठाकरे सेना, आप, समाजवादी पक्ष आणि वंचित काँग्रेस आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महापालिकेवर कोणाचा महापौर बसतो आणि विरोधी पक्ष नेते पद कोण मिळवतं हे पाहणं महत्वाचे असणारे आहे.
