Vasant More : वसंत मोरे हे आज शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचितचा (vanchit) मार्ग निवडला होता. (Uddhav Thackeray) त्यांनी वंचितमधून पुणे लोकसभाही लढवली आहे. (Vasant More ) दरम्यान, आता मोरे हे ठाकरे गटाच्या वाटेवर असून ते लवकरच हातात शिवबंधन बाधंणार असल्याची माहती आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सोबत संजय राऊतही, साजन पाचपुते हे उपस्थित असणार आहेत.
कहर! बिहारमध्ये १५ दिवसांत सात पूल कोसळले, विरोधकांकडून मुख्यमंत्री नितीशकुमार लक्ष
वसंत मोरे हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांची आतापासून तयारी असल्याचं दिसतय. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा लढवली. परंतु, या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. दरम्यान, ते उद्धव ठाकरेंची भेट घेत असल्याने ते आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचं बोललं जातय.
“मी कधीच पक्ष बदलला नाही, तुमचा दादा काम करणारा”; अजितदादांचं विरोधकांना सणसणीत उत्तर
हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यास वसंत मोरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असं बोललं जातय. मोरे हे मनसे सोडल्यानंतर वंचितमध्ये गेले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते, मी वंचित बहुजन आघाडीमध्ये शेवटपर्यंत राहील, मी सोडणार नाही असं मोरे म्हटले होते. मात्र, आता ठाकरेंच्या भेटीनंतर काय करतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. आज दुपारी त्यांची भेट होणार आहे.