भुजबळ स्वत:ला ओबीसीचे नेते म्हणवतात, त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा; आंबेडकरांची मागणी

Prakash Aambedkar On Chhagan Bhujbal :  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. संसदेचे उद्घाटन करताना साधू- संत बोलविल्यावरुन व धार्मिक कर्मकांड केल्यावरुन त्यांनी मोदी सरकारला सुनावले आहे. तसेच या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंतीदेखील होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितामध्ये दिल्लीतील महाराष्ट्र […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 30T173109.455

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 30T173109.455

Prakash Aambedkar On Chhagan Bhujbal :  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. संसदेचे उद्घाटन करताना साधू- संत बोलविल्यावरुन व धार्मिक कर्मकांड केल्यावरुन त्यांनी मोदी सरकारला सुनावले आहे. तसेच या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंतीदेखील होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितामध्ये दिल्लीतील महाराष्ट्र भवनामध्ये सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली.

हे करत असताना सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा हटविल्याचा आरोप राष्ट्रवादी कांग्रेसकडून करण्यात आला होता. यावर आता प्रकाश आंबडेकर यांनी भाष्य केले आहे. छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादीत लंकेंना आता टक्कर; लोकसभेसाठी बलाढ्य दावेदार वाढले !

छगन भुजबळ हे ओबीसीचे प्रतिक समजले जातात. ते स्वत:ला ओबीसीचे नेते म्हणवतात. तेव्हा हा ओबीसीचा अपमान आहे. जसं मकरंद पवार यांनी गोवारींच्या प्रश्नावर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. ज्या सभागृहासमोर 100 माणसं तुडवले जातात. त्या सभागृहात मी थांबणार नाही, असे पवार म्हणाल्याचे  आंबडेकरांनी सांगितले.

तोच कित्ता आता छगन भुजबळ यांनी गिरवला पाहिजे. महाराष्ट्र सदन हे भुजबळांनी बांधले आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले अन् अहिल्याबाई होळकर यांच्या अपमानानंतर भुजबळांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आंबेडकर म्हणाले.

Ahmednagar : सुजय विखे पाटलांविरोधात कोण? राष्ट्रवादीकडे एक नाही तर ‘सहा’ पर्याय

दरम्यान, छगन भुजबळांनी काल या प्रकरणावर भाष्य केले होते. सावरकर जयंतीला माझा विरोध नाही. मात्र, शिवराय यांची राजमुद्रा तिथे लावण्यात आली होती, ती झाकून सावरकरांचा पुतळा लावण्यात आल्याचं भुजबळांनी म्हटलं आहेत. पुढे ते म्हणाले की, तिथेच छोट्कया चौकात दोन पुतळे आहे. एक अहिल्याबाई होळकर यांचा अन् दुसरा सावित्रिबाई फुले यांचा. त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आले, मात्र पुतळे बाजूला करण्यात आले. दुसरीकडे हॉल असताना कार्यक्रम तिथेच का करण्यात आला. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, असे भुजबळ म्हणाले.

Exit mobile version