Ahmednagar : सुजय विखे पाटलांविरोधात कोण? राष्ट्रवादीकडे एक नाही तर ‘सहा’ पर्याय

Ahmednagar : सुजय विखे पाटलांविरोधात कोण? राष्ट्रवादीकडे एक नाही तर ‘सहा’ पर्याय

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमधून भाजपच्या सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना कोण टक्कर देणार? याविषयीच्या चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) 6 नावं पुढे आली आहेत. यात पारनेरचे तरुण आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, अरुणकाका जगताप, दादाभाऊ कळमकर, घनःश्याम शेलार यांच्या नावाचा समावेश आहे. आज मुंबईमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत या नावांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. (Ahmednagar Loksabha Election 2024, May Nilesh Lanke will become candidate against BJP MP Sujay Vikhe Patil)

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वपक्षीयांनी तयारी सुरु केली आहे. मतदारसंघाचा आढावा, पक्षाची ताकद वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, उमेदवारांची चाचपणी, जागावाटप अशा टप्प्यांवर तयारी सुरु आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून मुंबईत आज (३० मे) राष्ट्रवादीची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. याबैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे , खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कर्नाटकचा नाही, येथे उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला; राऊतांनी आघाडीच्या नेत्यांना ठणकावले!

या आढावा बैठकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाबाबतही चर्चा झाली. या बैठकीला राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राहुल जगताप, चंद्रशेखर घुले, घनःश्याम शेलार, अंबादास गारुडकर , राजेंद्र कोठारी हे उपस्थित होते. यावेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघचा आढावा घेण्यात आला. यावेळी काही काही नावांचीही चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.  तसंच लवकरात लवकर उमेदवार ठरवावा अशी मागणी सर्वच जणांनी केली.

आदित्य ठाकरेंची आमदारकी मोदींच्या आशीर्वादाने, नितेश राणेंचा हल्लाबोल

निलेश लंके सरस ठरणार?

दरम्यान, अहमदनगरमधून निलेश लंके प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ते खासदार सुजय विखे यांना थेट भिडतात. शिवाय जिल्ह्याच्या राजकाणात तरुणांना लंकेंचे आकर्षण आहे. पण आता राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्याही वाढली आहे. यामुळे आगामी काळात उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि अपेक्षाभंगाचे नारळ कोणाला मिळणार याकडे नगरकरांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube