Prakash Ambedkar : गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. फडणवीसांकडूनही त्यावर स्पष्ट भूमिका मांडली जात आहे. मात्र, आता मराठा आरक्षणावरून या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठे वक्तव्य केलं. या भांडणामागे ओबीसींना फसवण्याचा डाव असल्याचा दावा आंबेडकरांनी केली.
Olympics 2024 मधील यशामागे वडिलांचा मोठा त्याग; कसा आहे मनू भाकरचा प्रेरणादायी प्रवास?
प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी सायंकाळी सोलापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांच्यातील भांडण हे नकली आणि फसवं आहे. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. त्यामुळं ओबीसींना असं वाटतंय की, जरांगेंच्या विरोधात कोण, तर देवेंद्र फडणवीस. त्यामुळे आपली देवेंद्र फडणवीस असा शब्दप्रयोग सुरू झाला. मात्र फडणवीस ज्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत, त्या पक्षाकडून यासंदर्भात भूमिकाच घेतली जात नाहीये, त्यामुळं हे भांडणं नकली आहे. ते ओबीसींनी फसवण्यासाठी ठरवून भांडत आहेत, असा आरोप आंबेडकरांनी केला.
मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व, 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घेणार; जरांगेचा सरकारला इशारा
यावेळी बोलतांना त्यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री व्हावे. मात्र आरक्षणासारख्या ज्वलंत मुद्द्यावर, मनोज जरांगेंच्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर बोलावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मराठ्यांना ओबीसींमध्ये घुसवलं जाऊ नये
मराठ्यांना ओबीसींमध्ये घुसवलं जाऊ नये, ही आमची भूमिका आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यांना वेगळं ताट दिलं पाहिजे. वेगवेगळ्या निकषांनुसार हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. त्यात फक्त आर्थिक निकष हा मुद्दा नाही. ते निकष तुम्हाला ठरवावे लागलात, असंही आंबेडकर म्हणाले.
शनिवारी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्य सरकारने या प्रश्नावर एकत्रित चर्चा करण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ही एक पळवाट आहे. राजकीय पक्ष म्हणून तुम्ही उद्या सत्तेत आलात तर तुम्हाला या स्थितीला तोंड द्यावं लागेल. तसं असेल, तर तुम्ही जरांगेंच्या मागणीच्या बाजूने आहात की विरोधात आहात हे तुम्ही स्पष्ट केले पाहिजे. हे सर्व ओबीसींच्या विरोधात आहेत. म्हणून या पळवाटा काढल्या जात आहत. तुम्ही राजकीय भूमिका घेतल्यावर लोकांना तुमचा मुद्दा समजतो. त्यामुळेच आमच्याबद्दल ना ओबीसी नाराज आहेत, ना मराठे नाराज आहेत, असं आंबेडकर म्हणाले.