Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुक (Vidhansabha Election) लढणार असल्याचे काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. जरांगेंनीही इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली. जरांगे यांच्याकडे आतापर्यंत 800 इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. खुद्द जरांगेंनी आज ही आकडेवारी जाहीर केली आहे.
‘मी रस्त्याने येणार होतो,मात्र रस्ता खराब …’, आठवलेंनी दिला सरकारला घरचा आहेर
अवघ्या काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आल्या. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. अशातच जरांगेंनी पत्रकार परिषद घेत आपल्याकडे 800 इच्छुकांनी विधानसभेसाठी अर्ज दिल्याचं सांगितलं. त्यामुळं अनेक बड्या नेत्यांचे, राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. जरांगे म्हणाले, आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. तज्ज्ञांची समिती हे काम करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. मराठवाडा आणि विदर्भातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र कोकण आणि मुंबई विभागातून कमी अर्ज आले आहेत. अर्ज येतच आहेत. त्यामुळे इच्छुकांची अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढवायची की नाही, याचा निर्णय घ्यावा लागेल, असे जरांगे म्हणाले.
विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याचं बऱ्या; काळ्या फिती लावून आंदोलन करणाऱ्यांना फडणवीसांनी डिवचलं
पुढं ते म्हणाले, येत्या 29 तारखेला या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या मायबाप मराठा समाजाने हे आंदोलन ताकदीने लावून धरलं होतं. त्यामुळेच आंदोलनाला यश आलं. या यशाचे श्रेय मराठा समाजाच्या एकजुटीला जाते. त्यामुळे आम्ही 29 तारखेला अंतरवलीत एक छोटेखानी चर्चासत्र ठेवू, असं जरांगे म्हणाले. आज मराठा समाजाच्या कानावर काहीही आलं तरी मराठा समाज लाखोंच्या संख्येने अंतरवलीला येतो. माझ्या समाजाच्या चरणी नतमस्तक होतो. हा समाज एका हाकेवर येतो. यातूनच मला लढण्याचे बळ मिळतं, असंही ते म्हणाले.
आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीही मी आंदोलन करणार असून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात यासंदर्भात सभा घेणार असल्याचे जरागेंनी जाहीर केलं. मतदारसंघनिहाय बैठकांमध्ये शेतकरी आणि मराठा आरक्षणासह इतर सर्व प्रश्न मांडणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. लवकरच शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीक विम्याचे पैसे अद्याप बाकी आहेत, सरकार दरवेळी शेतकऱ्यांची फसवणूक करते, आता सरकार कर्जमाफी कशी देत नाही ते बघू, असेही ते म्हणाले.