Download App

राजेश पाटलांना निवडून द्या, पाच वर्षात दुप्पट निधी देईल; अजितदादांचे मतदारांना आवाहन

चंदगडमधून राजेश पाटील (Rajesh Patil) यांना पुन्हा निवडून द्या. पुढील पाच वर्षांत निधी दुप्पट नाही दिला तर नाव बदलतो,

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : चंदगड विधानसभा मतदारसंघाला (Chandgad) या कार्यकाळात 1600 कोटी रुपये मी दिले आहेत. चंदगडमधून राजेश पाटील (Rajesh Patil) यांना पुन्हा निवडून द्या. पुढील पाच वर्षांत निधी दुप्पट नाही दिला तर नाव बदलतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मतदारांना आवाहन केलं. महाराष्ट्रात महायुती पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जरांगे एकही उमेदवार उभा करणार नाहीत, त्यांची शरद पवार अन् CM शिंदेंशी कमिटमेंट, हाकेंचा दावा… 

कोल्हापुरातील चंदगड येथील जनसन्मान यात्रेदरम्यान बोलताना अजित पवारांनी मतदाराना हे आवाहन केलं. माझी लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना अजितदादा म्हणाले की, 1.59 कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे. महायुतीने लाडकी बहीण योजनेसह सर्वच योजनांच्या बाबतीत महायुतीने शब्द पाळलेला आहे. त्यामुळे मी महिला भगिनींना विनंती करत आहे की, त्यांनी विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये. ही योजना बंद करणार असल्याचे एका माजी मंत्री म्हणाला आहे. विरोधकांच्या पोटात जे होते तेच त्यांच्या ओठावर आलं. मात्र, महायुती सरकार आल्यावर ही योजना सुरूच राहणार, असं अजित पवार म्हणाले.

महायुतीचं ठरलं, 225 जागांवर एकमत, ‘या’ दिवशी होणार घोषणा? 

तर दुप्पट निधी देणार…
आमदार राजेश पाटील यांनी या भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत आमदार राजेश पाटील यांनी गेल्या तीन वर्षांत या भागाच्या विकासासाठी १६०० कोटी रुपये मिळवून दिले आहेत, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय स्थापन करण्यात राजेश पाटील यांचा मोलाचा वाटा होता. तुम्ही आम्हाला मतदान केल्यास पुढील टर्ममध्ये मतदारसंघाचा निधी दुप्पट करण्याची हमी मी देतो, असे अजित पवार म्हणाले.

हमीभाव वाढवण्याचा प्रस्तावावर सरकार सकारात्मक
कोल्हापुरातील शेतकरी वेळेवर कर्ज फेडण्यासाठी ओळखला जातो, असे सांगून ते म्हणाले की, १०० टक्के पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फायदा व्हावा यासाठी हमीभाव वाढवण्याचा प्रस्ताव मांडला असून आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले.

कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी, आयुर्वेदिक महाविद्यालयाची स्थापना होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन करत महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अधिकाधिक कल्याणकारी योजना सुरू केल्या जातील, असं अजित पवार म्हणाले.

 

 

follow us