Download App

Vidhansabha Election : माहिममध्ये कोणाचे काम करणार? नारायण राणे थेटच बोलले, ‘आम्ही….’

महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर असल्याने आम्ही त्याचंचं काम करणार, असं नारायण राणे म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Narayan Rane : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याविरोधात माहिम विधानसभा मतदारसंघात शड्डू ठोकणाऱ्या सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे माहिम विधानसभा मतदारसंघात सरवणकर विरुध्द अमित ठाकरे अशी लढत होणार आहे. दरम्यान, आता भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

पुण्यात मविआची शिष्टाई अयशस्वी, पर्वती, शिवाजीनगर अन् कसब्यात बंडखोरी कायम… 

महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर असल्याने आम्ही त्याचंचं काम करणार, असं नारायण राणे म्हणाले. त्यामुळे हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

लोकसभेला राज ठाकरे यांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेऊन भाजप नेत्यांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत सातत्याने विनंती केली. लोकसभेला नारायण राणे यांच्या प्रचारासाठीही राज ठाकरेंनी सिंधुदुर्गात जाहीर प्रचार सभा घेतली होती. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी राज ठाकरेंची बाजू न घेता सरवणकरांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली.

Assembly Election : नगर, शिर्डी, श्रीगोंद्यात बंडखोरी; चार मतदारसंघात सरळ लढती 

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना माहिममध्ये कोणाचा प्रचार करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले, आमचा उमेदवार कोण? आमचा महायुतीचा उमेदवार सदा सरवणकर आहेत. त्यासाठीच आम्ही काम करणार. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सकाळी इकडे आणि संध्याकाळी तिकडे त्यातले नाही. आमचा जॉब पर्मनंट आहे, असं राणे म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. ते राज्यातील विविध मतदारसंघातून उमेदवार उभे करणार होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याची घोषणा केली. याविषयी विचारलं असता राणे म्हणाले, त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, एवढीच आमची प्रतिक्रिया. आता आमचं काय, आम्ही कोकणातले. पिठी-भात, मासे खाणारे, तिकडे कुठं मराठवाड्यात जाणार, असं राणे म्हणाले.

राज ठाकरेंनी सरवणकरांची भेट टाळली…
दरम्यान, उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र राज ठाकरेंनी ती मागणी फेटाळून लावली. निवडणूक लढवायची असेल तर लढा, नाहीतर लढू नका. आम्हाला काही देणंघेणं नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी सरवणकर यांच्या भेटीची मागणी फेटाळून लावली. तर राज ठाकरेंनी आपल्या भेटीची मागणी फेटाळल्यामुळं आपण उमेदवारी अर्ज मागे घेत नसल्याचं सरवणकर यांनी जाहीर केलं.

follow us