पुण्यात मविआची शिष्टाई अयशस्वी, पर्वती, शिवाजीनगर अन् कसब्यात बंडखोरी कायम…

  • Written By: Published:
पुण्यात मविआची शिष्टाई अयशस्वी, पर्वती, शिवाजीनगर अन् कसब्यात बंडखोरी कायम…

Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीतील (Vidhansabha Election) लढतीचे चित्र आज स्पष्ट झालं. अनेक मतदारसंघात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात बंडखोरी झाली होती. मागील चार-पाच दिवसांपासून बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील बंडखोरी शमवण्यात मविआला अपयश आलं. कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांनी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

Assembly Election : नगर, शिर्डी, श्रीगोंद्यात बंडखोरी; चार मतदारसंघात सरळ लढती 

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केले होते. कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने पुन्हा एकदा विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या माजी महापौर कमल व्यवहारे आणि माजी नगरसेवक मुख्तार शेख यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बंडखोरांची भेट घेऊन समजून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना काही प्रमाणात यश आलं असून कसब्यातून मुख्तार शेख यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.मात्र कमल व्यवहारे यांनी शेवटच्या दिवशीही अर्ज माघारी न घेतल्यानं त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार हे निश्चित झालं आहे.

Video : दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर सतेज पाटलांचा उद्रेक 

पर्वती, शिवाजीनगर मतदारसंघातही बंडखोरी…
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांची भेट घेऊन त्यांचीही समजूत काढली. , शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशीही त्यांच फोनवर बोलणं करून दिल असल्याचं सांगण्यात येतं. तरीही आबा बागुल निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले असून त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळं पर्वती मतदारसंघात मविआच्या उमेदवार अश्विनी कदम, महायुतीच्या माधुरी मिसाळ आणि अपक्ष आबा बागुल यांच्यात लढत होणार आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या बंडखोर मनीष आनंद यांनीही उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तेही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. एकंदरीत पुण्यातील बंडखोरी रोखण्यात मविआच्या नेत्यांना अपयश आलं. दरम्यान, या बंडखोरीचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube