Download App

ईडी, सीबीआयचा वापर करून सरकारं पाडली, कंपन्या गुजरातला पळवल्या, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

धारावीची 1 लाख कोटींची जमीन अदानींच्या घशात घालण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. भाजपने अनेक प्रकल्प गुजरातला पळवले.

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elcton) प्रचाराला सुरुवात झालेली आहे. सध्या मुंबई येथील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा सुरू आहे. या सभेला संबोधित करतांना विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भाजप आणि महायुतीवर (Mahayuti) जोरदार हल्लाबोल केला. ईडी, सीआयचा वापर करून सरकार भाजप सरकार पाडते, भाजपने अनेक प्रकल्प गुजरातला पळवले, अशी टीका राहुल गांधींनी केली.

मी कामाचा माणूस, पाणी योजनेचे थकीत बिल माफ करून योजना सुरू केली; शिवाजीराव कर्डिले 

पुढं बोलतांना राहुल गांधी म्हणाले, ही लढाई विचारधारेची आहे. एकीकडे आंबेडकरांचे संविधान, एकता, समानता, प्रेम, आदर आहे, तर दुसरीकडे द्वेष, समोरून नाहीतर छुप्या पद्धतीने संघाचे लोक आणि भाजपवाले संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते छुप्या पद्धतीने संविधान कमकुवत करत आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.

नागा चैतन्य आणि साई पल्लवीची दिसणार केमिस्ट्री, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुचर्चित ‘थंडेल’ 

धारावीची 1 लाख कोटींची जमीन अदानींच्या घशात घालण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. भाजपने अनेक प्रकल्प गुजरातला पळवले. भाजपमुळे राज्यात बेरोजगारी वाढली. भाजपच्या काळात महागाई वाढली. जीएसटी, नोटंबदी हे लहान व्यापाऱ्यांविरोधातले हत्यार आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, सरकार निवडणूक आयोगावर दबाव आणत आहे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करून सरकार पाडत आहे.

भाजप गरिबांचा पैसा अदानी, अंबानींना देते
ते म्हणाले,  महाराष्ट्रातील महिलांना महायुती सरकार काही पैसे देत आहे. मात्र गॅस सिलिंडर, जीएसटी आणि अन्य माध्यमातून 90 हजार रुपये काढून घेते. आणि हे पैसे अदानी-अंबानींना देतेय, असा आरोपही राहुल गांधींना केला.

भारतात अनेक संस्था आहेत. नोकरशाही आहे. शिक्षण व्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था आहे. मात्र, एका पक्षाला आणि एकाच विचारधारेच्या लोकांना हे सरकार या सर्व संस्थामध्ये घुसवत आहेत, असंही ते म्हणाले.

महिलांसाठी मोफत प्रवास
ज्या जखमा, महागाईचा फटका भाजपने दिला, त्याच्या सगळ्यात जास्त वेदना महाराष्ट्रातील महिलांना होतात. त्यामुळं त्यांच्या बँक खात्यात दरमहा ३,००० रुपये जमा करणार आणि मोफत बस प्रवासाची योजनाही महाविकास आघाडी सुरू करणार, महाराष्ट्रात महिला बसमधून प्रवास करतील तेव्हा त्यांना बस तिकीटासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसच्या ५ गॅरंटी

दरम्यान, वेळी महाविकास आघाडीकडून 5 मोठी आश्वासनं देखील देण्यात आली.

• महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.

• शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन.

•जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.

• २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.

• बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत.

follow us