Assembly elections Result : राज्यभरात दि. 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections ) एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि.23) मतमोजणीला सुरूवात झाली असून प्राथमिक कल हाती आले आहेत. भाजपचा (BJPP) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भातील नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आघाडीवर आहेत. साकोलीतून नाना पटोले (Nana Patole) आघाडीवर आहेत.
महायुतीचे संग्राम जगताप 14 हजार मतांनी आघाडीवर …नगरमध्ये कोणाची आघाडी अन् कोणाची पिछाडी?
पोस्टल मतदानात विदर्भात महायुती 12 जागांवर आघाडीवर, तर महाविकास आघाडी तीन जागांवर आघाडीवर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार, कामठीतून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे, हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे, काटोलमधून भाजपचे चरणसिंह ठाकूर, तर बुलढाण्यातून संजय गायकवाड आघाडीवर आहेत.
Result Update : मराठवाड्यात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?; एका क्लिकवर मिळवा अपडेट
दिग्रस मतदारसंघ मविआचे माणिकराव ठाकरे 973 मताने आघाडीवर आहेत. त्यांना ठाकरे – 4157 इतकी मते आहेत. तर संजय राठोड 3815 (महायुती).
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप १२७३ मतांनी आघाडीवर आहेत. रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – 14536 इतकी मते आहेत. ठाकरे गटाच्या गोपाल दातकरांना 13263 मते आहेत.
अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम (अजित पवार गट) 2251 मतांनी आघाडीवर