Download App

तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या मंत्र्याचा अधिवेशनात सहभाग नको; वडेट्टीवारांची टीका करत मागणी

Vijay Vadettivar यांनी तुरुंगवासाची शिक्षा झालेला मंत्री अधिवेशनात का आहे. अशी टीका माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे

Vijay Vadettivar on Manikrao Kokate : 1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik District Sessions Court) 50 हजारांच्या दंडासह दोन वर्षांची शिक्षा सुनावलेली असल्याने कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे की, तुरुंगवासाची शिक्षा झालेला मंत्री महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहात मंत्री म्हणून कामकाज करणार हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार, असे चित्र आहे!

दक्षिण आफ्रिकेची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक; ७ गडी राखून इंग्लंडला केलं चीतपट

वडेट्टीवार म्हणाले की, तुरुंगवासाची शिक्षा झालेला मंत्री महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहात मंत्री म्हणून कामकाज करणार हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार, असे चित्र आहे. आज मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही.

..नाहीतर वाल्मीक अण्णा तुला सोडणार नाही; संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी कराड अन् घुले काय बोलले?

कोर्टात पुढील सुनावणी ५ मार्च रोजी आहे अस असताना कृषी मंत्री या पदावर माणिकराव कोकाटे बसू शकत नाही.सोमवार पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे, त्यांना शिक्षा झाल्याने ते मंत्री म्हणून अधिवेशनात कसे सहभागी होऊ शकतात? त्यांची आमदारकी रद्द का अजून झाली नाही हा संशोधनाचा प्रश्न आहे पण दोषी असलेली व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकत नाही.

मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अधिवेशनाच्या कामकाजात मंत्री म्हणून कोकाटे सहभागी करू नये. एक मंत्री ज्याला स्वतःला भ्रष्टाचार आणि कागदपत्रांची फेरफार प्रकरणात कोर्टाने आरोपी म्हणून शिक्षा सुनावली आहे तो मंत्री शेतकऱ्यांच्या हिताचे काय काम करणार ?

follow us