Download App

Vijay Vadettivar : ‘आमच्यातील वाद आता…’ पटोलेंशी झालेल्या वादावर वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण

Vijay Vadettivar On Nana Patole : कॉंग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफुस पाहायला मिळत आहे. मात्र कॉंग्रेला अशी गटबाजी आणि अंतर्गत वाद काही नवा नाही. त्यानंतर आता पुन्हा कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. यावेळी हा वाद आहे तो कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून त्यांच्यात या वादाला सुरूवात झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या गटाविरूद्ध कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्तवाखाली सर्वपक्षीय आघाडी उभी राहिली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार देवतळे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Patole VS Vadettivar : कॉंग्रेसमधील अंतर्गत धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, कोणता गट सरस ठरेल?

त्यानंतर विजय वडेट्टीवार यांची नाराजी समोर आली. ते म्हणाले राज्यात अनेक ठिकाणी अशी युती झाली आहे. तर मग सर्वांवरच कारवाई करावी लागेल. असा पवित्रा वडेट्टीवार यांनी घेतलं. त्यावर नाना पटोलेंनीही वडेट्टीवारांवर निशाणा साधला. पटोले म्हणाले वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर आम्ही एका बंद खोलीत याबाबत चर्चा करू. वडेट्टीवार हे काही इतके मोठे नाहीत की त्यावर मी इथं बोललं पाहिजे.

Nana Patole : बाजार समित्यांच्या निवडणुकीतून जनतेने जागा दाखवून दिली

मात्र त्यानंतर आता पटोलेंशी झालेल्या वादावर वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वडेट्टीवार म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माझ्यातील वाद आता संपलेला आहे. अंतर्गत वादावर आम्ही आता पडदा टाकलेला आहे. यापुढे कुठलाही विषय शिल्लक नाही. दिल्लीपर्यंत विषय नेण्याचा काही विषय नाही महाराष्ट्रातच तो विषय संपलेला आहे. या विषयाला आम्ही पुर्णविराम दिलेला आहे.

Tags

follow us